जनतेच्या पैशातून खाण पॅकेज का?
By Admin | Updated: July 23, 2014 00:48 IST2014-07-23T00:46:25+5:302014-07-23T00:48:47+5:30
पणजी : ट्रकवाले किंवा खाण अवलंबितांना जनतेच्या पैशातून पॅकेज देण्याची गरज नाही. पैसे द्यायचेच असतील, तर केंद्र सरकारकडून आणा किंवा ज्यांनी बेकायदा खाणींद्वारे लूट केली,

जनतेच्या पैशातून खाण पॅकेज का?
पणजी : ट्रकवाले किंवा खाण अवलंबितांना जनतेच्या पैशातून पॅकेज देण्याची गरज नाही. पैसे द्यायचेच असतील, तर केंद्र सरकारकडून आणा किंवा ज्यांनी बेकायदा खाणींद्वारे लूट केली, त्यांच्याकडून वसूल करून अवलंबितांना द्या, अशी मागणी करीत अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
पर्रीकर सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, अशा आरोपांच्या फैरी झाडीत प्रथमच आक्रमक बनलेल्या सावळ यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. दोन वर्षे मी सरकारबरोबर राहिलो; परंतु आता सर्व काही उमजले आहे, असे ते म्हणाले. सरकारने मोठमोठी आश्वासने दिली होती; परंतु लोकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. मांडवीतून कॅसिनो हटवतो, असे सांगितले; परंतु उलटेच घडले. नव्या कॅसिनोची भर पडली. प्रादेशिक आराखडा दहा वर्षे खितपत पडला आहे. माध्यम प्रश्न सुटलेला नाही. कचरा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला आहे. लोकायुक्त, राज्य माहिती आयुक्त हे सरकार देऊ शकलेले नाही. भ्रष्टाचार निर्मूलनाची गोष्ट दूरच; उलट भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे.
डिचोली पालिकेत मुख्याधिकारी उघडपणे लाच मागतो, असा आरोप त्यांनी केला. बेकायदा खाणींद्वारे केलेली लूट हे सरकार वसूल करू
शकले नाही. किनारी भागात ड्रग्स व्यवसाय फोफावतो आहे. कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
गुंतवणूक धोरणाच्या गोंडस नावाखाली पाच वर्षांत ५० हजार नोकऱ्यांचे आमिष दाखविले जात आहे. गेली अडीच वर्षे सरकारला हे शक्य झाले नाही आणि शक्य होत असेल
तर करून दाखवावे, असे आव्हान
त्यांनी दिले. (प्रतिनिधी)