शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तेलगोळ्यांबाबत कोर्टाच्या निर्देशाचे काय?

By admin | Updated: June 16, 2014 02:01 IST

तेलगोळ्यांबाबत कोर्टाच्या निर्देशाचे काय?

पणजी : तेलगोळ्यांच्या बाबतीत नेमके त्यांचे स्रोत काय व ते कसे तयार होतात याचे सलग पाच वर्षे विश्लेषण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने २0१२ साली राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाला दिले असताना त्याची कितपत अंमलबजावणी केली जाते, हा प्रश्नच आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या १0 तारखेपूर्वी अहवाल सादर करण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे. निवृत्त ब्रिगेडियर इयान डिकॉस्ता व अन्य दोघांनी सादर केलेल्या जनहित याचिकेवर हा आदेश देण्यात आला होता. तेलगोळ्यांमुळे किनारे काळवंडतात व विद्रूप होतात याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. न्यायालयाने पर्यटन खाते तसेच अन्य यंत्रणांना वेळोवेळी किनाऱ्यांवरील तेलगोळे काढण्याचे व किनारे स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. दर तीन महिन्यांनी एकदा तरी किनाऱ्यांवर समुद्राच्या पाण्याची तपासणी करण्याचे आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. तेलगोळ्यांचा उगम शोधून काढण्यासाठी हवाई टेहळणी करावी, हायड्रो कार्बन फिंगर प्रिंट तसेच अद्ययावत शास्रीय पध्दतीने अभ्यास करावा आणि मर्चंट शिपिंग कायद्यातील तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे कोर्टाने बजावले होते. मान्सूनपूर्व तसेच मान्सूननंतरही अशा प्रकारची चाचणी केली जावी, असे आदेशात म्हटले होते. मुरगाव बंदरात येणाऱ्या आणि तेथून जाणाऱ्या प्रत्येक मालवाहू जहाजाची तपासणी करावी. पोर्ट बंकरमधून इंधनाची किती वाहतूक झाली याची नोंद ठेवावी आदी निर्देश देण्यात आलेले आहेत. बंदर कप्तान, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण, केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालय आदी यंत्रणांना अंतर्गत जल वाहतुकीवरही जेथे बार्जेस, ट्रॉलर्स ये-जा करतात तेथे नजर ठेवण्यास सांगितले आहे. मात्र, या निर्देशांचे किती पालन होते, हा प्रश्नच आहे. (प्रतिनिधी)