कामगार कल्याण, सुरक्षिततेसाठी आम्ही वचनबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:31 IST2025-09-17T12:31:09+5:302025-09-17T12:31:51+5:30
मुंबईत ओएसएच इंडिया परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन

कामगार कल्याण, सुरक्षिततेसाठी आम्ही वचनबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा सरकार कामगार कल्याण, सुरक्षितता यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. मुंबईत ओएसएच इंडिया परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
सावंत म्हणाले की, कामाच्या ठिकाणी सुरक्षा म्हणजे मजबूत भारत. शाश्वततेपासून ते नवोपक्रमापर्यंत भारत सातत्याने नवीन विक्रम स्थापित करत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कारखाने आणि बाष्पक निरीक्षक, ईएसआय योजना आणि कामगार व त्यांच्या कुटुंबांसाठी आरोग्यसेवा, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या पलीकडे समर्थन देणाऱ्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांद्वारे गोव्याच्या प्रयत्नांची माहिती याप्रसंगी दिली.
ओएसएच इंडिया हे व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्यासाठी दक्षिण आशियातील आघाडीचे प्रदर्शन आणि परिषद आहे. इन्फॉर्मा मार्केट्स आणि ओएसएस इंडियाने या परिषदेचे आयोजन केले होते.