शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 08:45 IST

प्रदेश भाजप राज्य कार्यकारिणीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपने सी. टी. रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदावरून हटवल्याने त्यांचे गोवा प्रभारीपदही गेल्यात जमा आहे. नवीन प्रभारी म्हणून विनोद तावडे यांची वर्णी लागू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. लोकसभा निवडणूक जवळ असल्याने पक्षाला गोव्यासाठी नवा प्रभारी लवकर द्यावा लागेल. तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री असून, त्यांना गोव्याचा कोपरान् कोपरा ठाऊक आहे. यापूर्वी त्यांनी गोव्यात कामही केलेले आहे. त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने गोव्याचे प्रभारीपद त्यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रदेश भाजप राज्य कार्यकारिणीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला. तो पुढे म्हणाला की, सी.टी.रवी यांना प्रभारीपदावरून हटवल्याचे अधिकृत पत्र प्रदेश भाजपला अजून आलेले परंतु ज्या अर्थी सरचिटणीसपदावरून हटवले, त्याअर्थी सी. टी. रवी यांचे प्रभारीपदही गेल्यात जमा आहे.

तावडे हे अभाविपच्या मुशीत घडलेले आहेत. अलीकडेच अभाविपच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले होते शेजारी राज्यात असल्याने त्यांचे गोव्यात पूर्वीपासून येणे-जाणे आहे प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्यावेळ ते गोव्यात आलेले आहेत. भाजपच अनेक आमदार, मंत्री, पदाधिकारी कार्यकर्त्यांना ते जवळून ओळखतात सी. टी. रवी हे पक्षाचे राष्ट्रीय महामंत्र बी. एल. संतोष यांच्या खास विश्वासातील होते. परंतु आता रव यांना सरचिटणीसपदावरून दू केल्याने गोव्यासाठी नवीन प्रभारी द्यावा लागेल.

 

टॅग्स :goaगोवाVinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाPoliticsराजकारण