भाजप प्रवेश किंवा पाठिंब्याचा प्रश्नच नाही: विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2024 10:51 IST2024-01-29T10:50:12+5:302024-01-29T10:51:17+5:30

गोवा फॉरवर्ड लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीत नाही, असे सांगून ते म्हणाले की, विरोधी पक्षांना एकत्र आणणे हे काँग्रेस पक्षाचे काम आहे.

vijai sardesai made clear that no question of bjp entry or support | भाजप प्रवेश किंवा पाठिंब्याचा प्रश्नच नाही: विजय सरदेसाई

भाजप प्रवेश किंवा पाठिंब्याचा प्रश्नच नाही: विजय सरदेसाई

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा किंवा पाठिंबा देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी वृत्त फेटाळून लावले. 

मी छुप्या पद्धतीने काही करणाऱ्यातला माणूस नव्हे. सत्ताधारी - पक्षातील काही लोक या अफवा पसरवत आहेत, असा दावा त्यांनी केला. सरदेसाई म्हणाले, विधानसभेचे अधिवेशन तोंडावर असल्याने माझ्याबाबतीत अशा अफवा पसरवल्या जात आहेत, जेणेकरून मी विधानसभेत सरकारला धारेवर धरू नये. परंतु विरोधक म्हणून मी माझी जबाबदारी सभागृहात चोख बजावणार आहे. सरकारला प्रत्येक प्रश्नावर फैलावर घेणार आहे.

दरम्यान, गोवा फॉरवर्ड लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीत नाही, असे सांगून ते म्हणाले की, विरोधी पक्षांना एकत्र आणणे हे काँग्रेस पक्षाचे काम आहे.
 

Web Title: vijai sardesai made clear that no question of bjp entry or support