शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मनोहर पर्रीकर असतील तर दाखवा, नसतील तर श्राद्ध घाला; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 12:07 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या राजकारणात सक्रीय नाहीत. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक त्यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या राजकारणात सक्रीय नाहीत. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक त्यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निगरानीखाली मनोहर पर्रीकर 24 तास असतात. दरम्यान, 14 ऑक्टोबरपासून पर्रीकर सार्वजनिकरित्या कोठेही दिसून आले नाहीत. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. यादरम्यानच, काँग्रेस नेता जितेंद्र देशप्रभू यांनी पर्रीकरांसंदर्भात वादग्रस्त विधान केले. 

जितेंद्र देशप्रभू यांनी टीका करताना म्हटलं की, गोव्याचे मुख्यमंत्री आहेत की नाही?, अशी आमच्या मनात शंका निर्माण होत आहे. खासगी किंवा सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसून येत नाहीत. तुमच्याकडे जर मुख्यमंत्री नाहीत, तर मग त्यांचं श्राद्ध घाला. आम्हाला मुख्यमंत्री दाखवा तरी. आम्हाला पाहायचे आहे की, ते चालतफिरत आहेत का? बोलत आहेत का?, असे प्रश्न उपस्थित करत देशप्रभू यांनी वादग्रस्त विधान केले आहे. 

(मनोहर पर्रीकर हयात असल्याचे दाखवा; अन्यथा... गोवा काँग्रेसचे भाजपाला आव्हान)

14 ऑक्टोबरला मनोहर पर्रीकर यांना नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसले नाहीत. भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकरांच्या निवासस्थानी डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आले असून हे पथक त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसनं आरोप लावला आहे की, मुख्यमंत्र्यांच्या आसपास असलेल्या अधिकाऱ्यांचा समूह त्यांच्या गैरहजेरीत अयोग्यपद्धतीनं निर्णय घेत आहेत. दरम्यान, जितेंद्र देशप्रभूनं असंही म्हटलं की, मनोहर पर्रीकर जिवंत असतील तर ते सत्ताधारी भाजपानं गोव्याच्या जनतेसमोर सिद्ध करुन दाखवावं. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरcongressकाँग्रेसBJPभाजपा