VIDEO : गोवेकरांनो! मला काही दिवसांची सुट्टी द्या - मनोहर पर्रीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 20:51 IST2018-03-05T20:50:07+5:302018-03-05T20:51:08+5:30

तुम्हा लोकांनी माझ्यासाठी पंधरा दिवस प्रार्थना केली. मला आशीर्वाद दिले व त्यामुळे मी बरा झालो. मी पहिल्या चेअकअपसाठी मुंबईला जात आहे. मी पूर्ण बरा होण्यासाठी कदाचित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विदेशातही जाईन.

VIDEO: Give me some days off - Manohar Parrikar | VIDEO : गोवेकरांनो! मला काही दिवसांची सुट्टी द्या - मनोहर पर्रीकर 

VIDEO : गोवेकरांनो! मला काही दिवसांची सुट्टी द्या - मनोहर पर्रीकर 

पणजी : तुम्हा लोकांनी माझ्यासाठी पंधरा दिवस प्रार्थना केली. मला आशीर्वाद दिले व त्यामुळे मी बरा झालो. मी पहिल्या चेअकअपसाठी मुंबईला जात आहे. मी पूर्ण बरा होण्यासाठी कदाचित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विदेशातही जाईन. तुम्ही प्रार्थना सुरूच ठेवाल आणि मला काही दिवस उपचारांसाठी सुट्टी मंजूर कराल अशी आशा ठेवतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी प्रथमच व्हिडीओद्वारे आपले म्हणणे गोमंतकीयांसमोर मांडले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मनोहर पर्रीकर यांचा हा व्हिडिओ संवाद सर्वत्र पाठविण्यात आला आहे. गेल्या सतरा दिवसांत मनोहर पर्रीकर यांनी प्रथमच अशाप्रकारे संवाद साधला. मी सर्व गोमंतकीयांचे आभार मानतो. मी मुंबईला जात आहे पण तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला तर मी पूर्ण बरा होण्यासाठी व आजारावर उपचार करून घेण्यासाठी विदेशात जाईन. तुमचे आशीर्वाद व प्रार्थना सुरूच राहतील अशी मला आशा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 
दरम्यान, मनोहर पर्रीकर यांच्यासोबत त्यांचे मोठे पुत्र उत्पल पर्रीकर हे सुद्धा मुंबईला गेले आहेत.  मनोहर पर्रीकर हे अमेरिकेला गेल्यानंतर त्यांना तिथे भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी जाण्याचे गोव्यातील दोघा मंत्री व आमदारांनी ठरवले आहे.  मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी आपल्या दोनापावल येथील निवासस्थानी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सगळे मंत्री, भाजपचे आमदार, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. उपसभापती मायकल लोबो हेही  मनोहर पर्रीकर यांच्यासोबत वीस मिनिटे होते.  मनोहर पर्रीकर खास प्रायव्हेट विमानाने मुंबईला गेले.

Web Title: VIDEO: Give me some days off - Manohar Parrikar