शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीयांची पाँडिचेरीत वाहनखरेदी, करचुकवेगीरीविरुध्द आरटीओ उघडणार कडक मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 14:38 IST

गोवा सरकारने आता या करात प्रचंड वाढ केली आहे.

पणजी- एक काळ असा होता की, वाहनांची नोंदणी कमी खर्चात होते म्हणून शेजारी महाराष्ट्र, कर्नाटकातील लोक गोव्यात येऊन वाहन खरेदी करीत असत. तेव्हा महाराष्ट्रात १२ टक्के तर येथे केवळ ४ टक्के नोंदणी कर होता. गोवा सरकारने आता या करात प्रचंड वाढ केली आहे. आरामदायी मोटारींवरील कर तब्बल २१ टक्क्यांवर नेल्याने गोव्यातील लोक आता पाँडिचरीत वाहने खरेदी करु लागले आहेत. यामुळे येथील वाहतूक खात्याचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याने पाँडिचरीत वाहन नोंदणी करणाऱ्यांविरुध्द मोहीम उघण्याचा निर्णय येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

वाहतूक संचालक निखिल देसाई म्हणाले की, वाहन नोंदणीचा लाखो रुपये खर्च वाचविण्यासाठी गोंमतकीय पाँडिचेरीत मोटारी खरेदी करीत आहेत कारण तेथे हा कर अत्यंत कमी आहे. अन्य राज्यातून खरेदी करुन गोव्यात आणल्या जाणाऱ्या आलिशान मोटारींवर विमानतळ, पब, पंचतारांकित हॉटेल्स आदी ठिकाणी पाळत ठेवली जाणार आहे. खास करुन पाँडिचरीच्या ‘पीवाय’ रजिस्ट्रेशनच्या मोटारी आढळून आल्यास खात्याचे अधिकारी त्याची दखल घेतील आणि पुढील कारवाई करतील.

पाँडिचेरीत नोंदणी शुल्क अत्यंत कमी आहे त्यामुळे तेथे नोंदणी केली जाते. अशा आलिशान मोटारी शनिवार, रविवार विकेण्डला किंवा सुट्टीच्या दिवशीच बाहेर काढल्या जातात. तशी  युक्ती वाहनमालक लढवतात. आलिशान व महागड्या मोटारींना गोव्यात २१ टक्के कर लावला जातो. परंतु पाँडिचेरीसारख्या राज्यात तो १ टक्क्यापेक्षा कमी आहे. ६0 लाख रुपये किमतीच्या मोटारीसशाठी येथे आयुष्यभराचा रस्ता कर ९ लाख ६0 हजार रुपये आहे. तर पाँडिचरीत तो केवळ १ लाख रुपये आहे.

आरटीओच्या एका अीधकाऱ्याने असे मत व्यक्त केले की, लोकांच्या सहकार्याशिवाय कारवाईची अंमलबजावणी अशक्य आहे. महागडी वाहने जप्त करुन आणली तर ती योग्यरित्या सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. मूळ कराच्या २५ टक्के जास्त दंड म्हणून आकारण्याचे अधिकार खात्याला आहेत. अंमलबजावणी विभाग त्यासाठी सतर्क झाला आहे. कर चुकवेगिरी शोधणे हे तसे सोपे काम नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार देशभरात कुठेही वाहन नोंदणी करता येते. मात्र सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ एकाच राज्यात वाहनाचा वापर करणार असल्यास त्याची नोंदणी त्याच राज्यात करावी, असा नियम आहे. परंतु या नियमाला कर चुकवेगिरी करणारे हरताळ फासतात. नोंदणी बदलायची असल्यास मूळ जेथे नोंदणी झाली आहे, त्या संघप्रदेशाकडून किंवा राज्याकडून ना हरकत दाखला आणावा लागतो. पाँडिचरीत वाहन नोंदणी साठी तेथील कायम वास्तव्याचा पत्ता देण्याची गरज भासत नाही. गोव्यात मात्र कायम निवास असलेल्या पत्त्याचा पुरावा सादर करावा लागतो.वाहनवेड्या गोवेकरांना विलायती गाड्यांचा सोस आहे हे सर्वज्ञात आहे. कोट्यवधी रुपये किमतीच्या आलिशान ‘लॅम्बोर्गिनी’, सुमारे पाऊण कोटीच्या घरात किंमत असलेली बीएमडब्ल्यू, फेर्रारी, मार्सेती, लॅनोव्हर आदी विदेशी मोटारीही येथे दिसतात.