शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

पणजीची वाट लागली, आमदार बदला; उत्पल पर्रीकर संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 8:37 AM

'स्मार्ट सिटी'वरून बाबूश मोन्सेरात यांच्यावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पणजीचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम झाले आहेत. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे स्मार्ट सिटीची वाट लागली असून त्याचा त्रास पणजीकरांना भोगावा लागत आहे, असा आरोप उत्पल पर्रीकर यांनी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर केला. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी बदलण्याची सादही पणजीवासीयांना घातली.

काल, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश चोपडेकर, दीपक म्हापसेकर, शुभदा धोंड व रेखा कांदे उपस्थित होत्या. स्मार्ट सिटी कामातील बेजबाबदारपणामुळे पणजीकरांसह इतरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघातात बळी गेला, त्याला स्मार्ट सिटीचे अनियोजित कामच जबाबदार आहे; पण पणजीचे आमदार त्यांचे महापौर पुत्र याविषयी काहीच कारवाई करताना दिसत नाहीत. 

पणजीवासीयांच्या सूचना हे लोकप्रतिनिधी ऐकून घेत नसल्याने लोकांचे फोन आम्हाला येत आहेत. हा आमदार स्मार्ट सिटीचा निधी निवडणुकीसाठी वापरत आहे. आतातरी पणजीवासीयांनी हे नेतृत्व बदलण्याची गरज आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्ज यांना निवेदन दिले असून त्यात विविध मागण्या केल्या आहेत. तसेच लवकर या प्रकल्पाच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांना पणजीकरांच्या सर्व समस्या सांगितल्या जातील, असेही पर्रीकर यांनी सांगितले.

पक्षाशी निष्ठावंत राहिलो

पणजीत पोटनिवडणूक झाली तेव्हा मला पणजीवासीयांकडून निवडणूक लढविण्याचा दबाव येत होता; पण मी पक्षश्रेष्ठीच्या सांगण्यावरून निवडणूक लढविली नाही. त्यावेळी निवडणूक लढविण्याची मी तयारी दर्शविली असती तर मला अडवायची कोणाची हिंमत झाली नसती; पण दुसऱ्यावेळीही माझ्यावर तसेच आमच्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे हे कळल्यावर मी अपक्ष निवडणूक लढविली. अजूनही पणजीतील निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते हे माझ्यासोबत असून आम्ही कधीही बंडखोरी केलेली नाही, असेही उत्पल पर्रीकर म्हणाले.

महापौरांवर अविश्वास ठराव आणा

आमदार म्हणून पणजीचे प्रतिनिधित्व करताना मनपातही स्वतःच्या मुलाला महापौर म्हणून आणून बसविले आहे. मात्र, ते दोघेही आपल्या पदाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे विरोधी नगरसेवक तसेच सत्ताधारी नगरसेवकांनी पणजीवासीयांसाठी एकत्र येत महापौरांवर अविश्वास ठराव आणणे गरजेचे आहे. बाबूश यांच्या दबावाला बळी न पडता पणजीत अयोग्य घडत आहे त्याला पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही उत्पल पर्रीकरांनी नगरसेवकांना केले.

 

टॅग्स :goaगोवाUtpal Parrikarउत्पल पर्रिकरPoliticsराजकारण