गोव्यात ॲप-आधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याची तातडीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 05:31 IST2025-07-12T05:31:12+5:302025-07-12T05:31:26+5:30

मालपें- पेडणे ते चालकावर हल्ला करून टॅक्सी पळवली, दोघांना संशयावरून अटक 

Urgent need to implement app-based taxi system in Goa | गोव्यात ॲप-आधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याची तातडीची गरज

गोव्यात ॲप-आधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याची तातडीची गरज

किशोर कुबल

पणजी : बांदा (सिंधुदुर्ग) येथे जाण्यासाठी टॅक्सी ठरवून वाटेत मालपें- पेडणे ते चालकावर हल्ला करून टॅक्सी पळवल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांना अटक करण्यात आली आहे. या एकूणच घटनेने चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

ॲपआधारित टॅक्सी सेवेला विरोध करणाऱ्या स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेनंतर सुनावले आहे. एका कार्यक्रमात बोलताना सावंत यांनी तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी जोरदार भूमिका मांडताना  गोव्यात ॲप-आधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली.

सावंत म्हणाले की, डिजिटल बुकिंग आणि ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म असता तर टॅक्सी चालकावरील हल्ला आणि त्यानंतर वाहन चोरी रोखता आली असती तसेच किंवा आरोपींना सहज शोधता आले असते. टॅक्सी बुकिंग अॅपसारखी योग्य डिजिटल प्रणाली असती तर पोलिसांना गुन्हेगाराची ओळख पटवणे आणि त्यांना पकडणे खूप सोपे झाले असते‌' या घटनेने जाग आणणारा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रांना तंत्रज्ञानाचा स्वीकार करून डिजिटल नवोपक्रमाकडे वळण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'प्रत्येक क्षेत्रात, विशेषतः पर्यटनात तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. सार्वजनिक सुरक्षा, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी डिजिटलायझेशन हा एकमेव उपाय आहे.' दरम्यान, गोव्याची पर्यटन आधारित अर्थव्यवस्था आधुनिकीकरणावर जोर देत  सावंत यांच्याकडून हे विधान आले आहे.

Web Title: Urgent need to implement app-based taxi system in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.