गोव्यातील बार्से येथे रेल्वेच्या बोगदयात अज्ञात इसम मृतावस्थेत सापडला, रेल्वेच्या धडकेने ठार
By सूरज.नाईकपवार | Updated: March 10, 2024 18:53 IST2024-03-10T18:52:51+5:302024-03-10T18:53:31+5:30
गोव्यातील दक्षिण गोव्यातील बार्से येथे आज रविवारी रेल्वे बोगदयात रुळावर एक अज्ञात इसम मृतावस्थेत सापडला.

गोव्यातील बार्से येथे रेल्वेच्या बोगदयात अज्ञात इसम मृतावस्थेत सापडला, रेल्वेच्या धडकेने ठार
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यातील बार्से येथे आज रविवारी रेल्वे बोगदयात रुळावर एक अज्ञात इसम मृतावस्थेत सापडला. रेल्वेच्या धडकेने त्याला मृत्यू आला. मयत अंदाजे ५० ते ५५ वयोगटातील आहे. रेल्वे बोगदयात एका अज्ञाताचा मृतदेह असल्याचे काणकोण रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरने फाेनवरुन माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पहाणी केली असता, तेथे एक मृतदेह आढळला. मयत अंदाजे ५० ते ५५ वयोगटातील आहे. घटनास्थळी त्याची ओळख पटविण्यासारखी एकही गोष्ट सापडली नाही.
अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनखाली पुढील पोलिस तपास चालू आहे. रेल्वेच्या धडकेने त्याच्या अंगावर अनेक जखमा आहेत. मयत देहयष्टीने मजबूत आहे. त्याची ओळख पटविण्याचे सदया काम चालू आहे. पोलिसांनी बिनतारी संदेशही पाठवून दिला. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.