शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकला अवमान नोटीस

By admin | Updated: May 30, 2014 02:22 IST

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी लवादाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत अक्षम्य चालढकलपणा करण्याच्या कर्नाटक सरकारच्या कृतीची गोवा सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी लवादाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत अक्षम्य चालढकलपणा करण्याच्या कर्नाटक सरकारच्या कृतीची गोवा सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे. कर्नाटकला गोव्याने अवमान नोटीस पाठवली असून त्या नोटिशीनंतर कर्नाटकच्या शासकीय पातळीवर धावपळ सुरू झाल्याची माहिती गोवा सरकारला मिळाली आहे. कर्नाटककडून म्हादईचे पाणी वळविले जाऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यास म्हादई पाणी तंटा लवादाने यापूर्वी आपल्या अंतरिम आदेशाद्वारे सांगितले आहे. लवादाच्या सूचनेनुसार कर्नाटकने स्वखर्चाने बांध तसेच भिंत वगैरे बांधणे गरजेचे आहे. तथापि, कर्नाटक सरकार हे काम करत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी कर्नाटकला अवमान नोटीस पाठवावी, असा सल्ला गोवा सरकारला दिला. त्यानुसार सरकारने पाठवलेली नोटीस कर्नाटकला गुरुवारी मिळाली व धावपळ सुरू झाली. कर्नाटकचे जलस्रोतमंत्री, प्रधान जलस्रोत सचिव आणि जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाईल, असे गोवा सरकारने नोटिशीद्वारे बजावले. यामुळे आता शुक्रवारपासून युद्धपातळीवर कणकुंबीच्या बाजूने म्हादई नदीच्या कक्षेत कर्नाटकच्या यंत्रणेकडून उपाययोजनांचे काम सुरू होणार आहे. गुरुवारी सायंकाळी तिथे ट्रकमधून बांधकाम साहित्य आणून टाकण्यात आले आहे, अशीही माहिती गोवा सरकारला मिळाली आहे. खरोखर काम सुरू होतेय की नाही, हे पाहण्यासाठी गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल नाडकर्णी हे तिथे भेट देणार आहेत. गोव्याचे जलस्रोत सचिव परिमल रे हेही त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. गोवा-कर्नाटक दरम्यानच्या पाणी तंट्याबाबत लवादासमोर सुनावणी सुरू आहे. कर्नाटक लवादाच्याही सूचनांचे नीट पालन करीत नसल्याने गोवा सरकार नाराज झाले आहे. कर्नाटकविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर करण्याची भूमिका गोव्याने घेतल्यामुळे आता लवादाच्या सूचनांचे पालन होईल, असा विश्वास काही अधिकार्‍यांना वाटतो. (खास प्रतिनिधी)