पार्टीत दोघा तरुणांचा मृत्यू

By Admin | Updated: April 20, 2015 00:50 IST2015-04-20T00:50:38+5:302015-04-20T00:50:48+5:30

मडगाव : पहाटेपर्यंत चाललेल्या बर्थडे पार्टीत दोन युवकांचा मृत्यू होण्याची खळबळजनक घटना मायणा येथे घडली. पार्टीत अमली प

Two young people die at the party | पार्टीत दोघा तरुणांचा मृत्यू

पार्टीत दोघा तरुणांचा मृत्यू

मडगाव : पहाटेपर्यंत चाललेल्या बर्थडे पार्टीत दोन युवकांचा मृत्यू होण्याची खळबळजनक घटना मायणा येथे घडली. पार्टीत अमली पदार्थांचे खुलेआम अतिसेवन केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. हाच धागा पकडून पोलिसांनी आपला तपासही सुरू केला आहे. पराग रायकर (२६) व रॉडसन मोन्तेरो (२७) अशी मृतांची नावे आहेत.
मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळाच्या शवागारात ठेवले आहेत. सोमवारी चिकित्सा झाल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल. तूर्त अनैसर्गिक घटना म्हणून नोंद केल्याची माहिती मडगाव पोलीस विभागाचे उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. चौकशीसाठी पोलिसांनी काहीजणांना ताब्यातही घेतले आहे. त्यात पार्टी आयोजक एलस्टन डिमेलोचाही समावेश आहे.
मायणा येथील एलस्टन डिमेलो याच्या पार्टीत ही घटना घडली. शनिवारी त्याचा सव्वीसावा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने घरी जंगी पार्टी आयोजिली होती. ती दुपारी सुरू झाली होती, अशी माहिती मायणा परिसरातील लोकांनी दिली. पार्टी पहाटेपर्यंत चालू होती. त्यात सुमारे ३५ जण सहभागी झाले होते. डिमेलो हा डिजे आहे. पार्टीत त्याचे कळंगुट येथील (पान ७ वर)

Web Title: Two young people die at the party