सांपेद्र-दिवाडी मार्गावर दोन नव्या फेरीबोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:04 IST2025-10-23T10:03:40+5:302025-10-23T10:04:08+5:30
जून २०२६ पासून त्याची वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.

सांपेद्र-दिवाडी मार्गावर दोन नव्या फेरीबोटी मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: चोडण-रायबंदरनंतर आता सांपेद्र-दिवाडी या जलमार्गावरही दोन नव्या रो रो फेरीबोट सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या रो रो फेरीबोटी २१ मीटर लांबीच्या असतील, अशी माहिती नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमराजे भोसले यांनी दिली.
सांपेद्र-दिवाडी हा जलमार्ग कमी पल्ल्याचा असल्याने या मार्गावर २१ मीटर लांबीच्या दोन मिनी रो रो फेरीबोटी सुरु केल्या जातील. सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. जून २०२६ पासून त्याची वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.
भोसले म्हणाले, चोडण - रायबंदर हा जलमार्ग लांब पल्ल्याचा असल्याने तसेच तेथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्याठिकाणी कार्यरत असलेल्या दोन्ही रो रो फेरीबोटी या ३५ मीटर लांबीच्या आहेत. सापेंद्र - दिवाडी हा जलमार्ग कमी पल्ल्याचा असल्याने या मार्गावर २१ मीटर लांबीच्या दोन मिनी रो रो फेरीबोटी सुरू केल्या जातील. जुने गोवे दिवाडी जलमार्ग कमी पल्ल्याचा असल्याने त्याठिकाणी रो रो फेरीबोटी सुरू केल्या जाणार नसल्याचे सांगितले.
दर निश्चिती अद्याप नाही
सांपेद्र - दिवाडी हा जलमार्गावरील रो रो फेरीबोटी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिल्याने त्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. सध्या तरी या मार्गावर किती तिकीट आकारणी करायची हे अद्याप ठरले नाही. सरकार त्याबाबत निर्णय घेईल. जून २०२६ मध्ये सांपेद्र -दिवाडी हा जलमार्गावर रो रो सुरु होतील.
नादुरुस्तीच्या समस्येवर मात
सध्या चोडण - रायबंदर या जलमार्गावर सुरू असलेल्या रो रो फेरीबोटींमध्ये पाण्यातील कचरा अडकत असल्याचे प्रकार घडत आहेत. तसे होऊ नये यासाठी नवे तंत्र विकसित केल्याचेही भोसले यांनी सांगितले.