शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

साकवाळ महामार्गावरील अपघातात दोन अल्पवयीन बालकांचा दुर्देवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:44 PM

जॉगिंगसाठी गेले असता भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने या दोन्ही बालकांना मागून दिली जबर धडक

वास्को: सोमवारी (दि.१६) पहाटे दक्षिण गोव्यातील साकवाळ भागात जॉगिंगसाठी गेलेल्या दर्शन लमाणी (वय १४) व अनिल राठोड (वय १६) या दोन अल्पवयीन मुलांना मागून भरधाव वेगाने येऊन चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने दोघांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात मरण पावलेले हे दोन्ही बालक एकाच वसाहतीतील राहणारे असून त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियाबरोबरच परिसरातही दु:खाचे वातावरण आहे.वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सदर अपघात घडला. जुआरीनगर येथील ‘लमाणी कॉलनी’ मध्ये राहणारे दर्शन लमाणी व अनिल राठोड हे बालक मित्र असून ते सकाळी ६.३० च्या सुमारास जॉगिंगसाठी घरातून बाहेर निघाले होते. दोघेही बालक जॉगिंग करत साकवाळ येथील बिट्सपिलानी कॉलेज च्या बाहेरील रस्त्यावर पोहोचले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (चारचाकी मडगावहून दाबोळी विमानतळाच्या दिशेने येताना) ‘हुंडाई आय २०’ या चारचाकीने (क्र: केए ५१ एमएम १५०१) त्या दोन्ही बालकांना जबर धडक दिली. सदर अपघातात दोन्ही बालक फेकले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.भरधाव वेगाने चारचाकी हाकून दोन अल्पवयीन बालकांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या चारचाकी चालक गुरू गुगन (वय ३६, रा: वेळ्ळूर - तमिळनाडू) यास वेर्णा पोलिसांनी त्वरित ताब्यात घेऊन कारवाई करून त्याला अटक केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिली. सोमवारी अपघातात मरण पोचलेल्या दर्शन व अनिल यांचा मृतदेह नंतर चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आला असून येथे त्यांच्या मृतदेहावर पंचनामा करण्यात आला. नंतर दोघांचाही मृतदेह मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवून त्यांच्यावर शवचिकित्सा करून त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वेर्णा पोलीसांनी दिली.सोमवारी सकाळी अपघातात मरण पोचलेला दर्शन लमाणी हा काणकोण येथील श्री कटयानी भानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होता अशी माहिती मिळालेली असून अनिल राठोड साकवाळ येथील सेंट जोझेफ विद्यालयातील विद्यार्थी असल्याचे सूत्रांनी माहितीत कळविले. एकाच वसाहतीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसोबतच शेजाऱ्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला. वेर्णा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात