कोरगावचे दोन लाचखोर पंच अटकेत

By Admin | Updated: February 13, 2015 01:13 IST2015-02-13T01:13:39+5:302015-02-13T01:13:50+5:30

मांद्रे : लाचलुचपत प्रतिबंधक कायदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरगाव पंचायतीच्या दोन पंचसदस्यांना हरमल येथे समाजकार्यकर्ते

Two crooks of Koragut were arrested | कोरगावचे दोन लाचखोर पंच अटकेत

कोरगावचे दोन लाचखोर पंच अटकेत

मांद्रे : लाचलुचपत प्रतिबंधक कायदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरगाव पंचायतीच्या दोन पंचसदस्यांना हरमल येथे समाजकार्यकर्ते मॉर्गन त्रावासो यांच्या कार्यालयात १ लाख रुपयांची लाच घेताना सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ५० हजार रोख व २५ हजारांच्या दोन धनादेशांचा समावेश आहे. कारवाई गुरुवारी रात्री ८.१५ वाजता करण्यात आली.
मागणी केलेल्या एकूण पाच लाखांपैकी शिल्लक राहिलेली ४ लाखांची रक्कम गुरुवारी सायंकाळी ७ वाजता हरमल येथील कार्यालयात देण्याचे त्रावासो यांनी मान्य केले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सापळा रचला. कोरगाव पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य सुदीप कोरगावकर व पंच डॉमनिक फर्नांडिस यांना मॉर्गन त्रावासोंकडून लाच स्वीकारताना पकडले. दोन्ही पंचसदस्यांनी त्रावासोंकडे मागणी केलेल्या ५ लाखांपैकी १ लाखाची रक्कम डिसेंबर २०१४ रोजी आगाऊ घेतली होती. (पान २ वर)

Web Title: Two crooks of Koragut were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.