मोलेमध्ये दोन कारचा अपघात, तीन जण जखमी
By आप्पा बुवा | Updated: June 4, 2023 17:58 IST2023-06-04T17:57:52+5:302023-06-04T17:58:03+5:30
सुकतळे मोले येथील टेट्रा फॅक्टरीच्या नजीक इनोव्हा कारने विरूद्ध दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणारा अल्टो कारला धडक दिली.

मोलेमध्ये दोन कारचा अपघात, तीन जण जखमी
फोंडा : सुकतळी मोले येथे दोन कार एकमेकांसमोर धडकल्याने झालेल्या अपघातात अल्टो कार मधील दोघे गंभीर व इनोव्हा कारचा चालक जखमी झाल्याने त्या तिघांनाही गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तानुसार, रविवारी सकाळी अकराच्यादरम्यान केए -25- झेड- 7555 नोंदणी क्रमांकाची इनोव्हा कार धारबांदोड्याच्या दिशेने जात होती तर, जीए- 07- सी- 87 0 1 ह्या क्रमांकाची अल्टो मोलेच्या दिशेने जात होती. सुकतळे मोले येथील टेट्रा फॅक्टरीच्या नजीक इनोव्हा कारने विरूद्ध दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणारा अल्टो कारला धडक दिली.
सदरचे धडक बसताच दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अल्टो कार मधील ड्रायव्हर जुलियो रेवरिडो (राहणार पणजी) व नरून निसा (राहणार छत्तीसगड) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत, तर इनोव्हा कार चालक मंजुनाथ सिद्धेगिरेमठ (राहणार धारवाड) याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने, तिघांनाही अगोदर पिळये येथील इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी त्यांना बांबोळी येथील जीएमसी मध्ये हलविण्यात आले आहे.
इनोव्हा कारमधील नागराज अश्विन हा किरकोळ जखमेवर निभावला आहे. सदर अपघाताची बातमी मिळताच कुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना इस्पितळात दाखल केले आहे.