अवैध रेती उपशाप्रकरणी गोव्यात दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:33 PM2020-01-17T12:33:45+5:302020-01-17T12:33:53+5:30

अवैध रेती उपशाप्रकरणी उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतलेली असतानाही गोव्यात बेकायदेशीररीत्या रेती उपसा केला जात

Two arrested in Goa for illegal sand subdivision | अवैध रेती उपशाप्रकरणी गोव्यात दोघांना अटक

अवैध रेती उपशाप्रकरणी गोव्यात दोघांना अटक

Next

मडगाव: अवैध रेती उपशाप्रकरणी उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतलेली असतानाही गोव्यात बेकायदेशीररीत्या रेती उपसा केला जात असून, राज्यातील दक्षिण गोव्यातील सोनशे-कुडतरी येथे नदीच्या पात्रात बेकायदेशीर रेती उपसा केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. क्लेमंट फर्नांडिस (४६ ) व मुकुंद परब (४0) अशी संशयितांची नावे आहेत. मायणा-कुडतरी पोलिसांनी ही कारवाई केली. काल गुरुवारी रात्री सोनशे - कुडतरी येथे एका कारवाई पोलिसांनी पंधरा क्युबिक मीटर रेती जप्त केली होती. घटनास्थळी एक होडी , पाणी खेचणारे एक पाईपही जप्त करण्यात आले होते.

सासष्टी तालुक्याचे मामलेदार प्रतापराव गावकर हे तक्रारदार आहेत. गुरुवारी सासष्टी मामलेदार , पोलीस , कॅप्टन ऑफ पोर्टस, जलस्त्रोत खाते तसेच खाण संचलनालयाने एक संयुक्त पाहणी केली होती. यात सोनशे येथे नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा केली जात असल्याचे या पथकाला आढळून आले. घटनास्थळी रेती उपसासाठी वापरले जाणारी वस्तूही सापडल्या. सकाळी साडेनऊ वाजता वरील पथकाने ही कारवाई केली. भारतीय दंड संहितेच्या ३२९ व २१ खाण व खनिज कायद्यांतर्गंत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश वेळीप हे पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title: Two arrested in Goa for illegal sand subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.