कदंब बायपास मार्गावर वाहतूक कोंडी सुरूच

By पूजा प्रभूगावकर | Updated: March 13, 2024 13:22 IST2024-03-13T13:21:57+5:302024-03-13T13:22:38+5:30

पणजीहून जुने गोवेकडे जाणारा रायबंदर येथील रस्ता स्मार्ट सिटीच्या कामासाठी ३० एप्रिल पर्यंत बंद असल्याने सध्या सर्व वाहने कदंब बायपास येथे वळवली आहे.

Traffic congestion continues on Kadamba Bypass Road | कदंब बायपास मार्गावर वाहतूक कोंडी सुरूच

कदंब बायपास मार्गावर वाहतूक कोंडी सुरूच

पणजी: कदंब बायपास मार्गावर सलग तिसऱ्या दिवशी बुधवारीही वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे चिंबल जंक्शन येथून वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहनचालक हैराण झाले. यामार्गावरुन कदंब, खासगी बसेसही सोडल्या जात असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.

पणजीहून जुने गोवेकडे जाणारा रायबंदर येथील रस्ता स्मार्ट सिटीच्या कामासाठी ३० एप्रिल पर्यंत बंद असल्याने सध्या सर्व वाहने कदंब बायपास येथे वळवली आहे. त्यामुळे बायपास येथे विशेष करुन सकाळी व संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहने संथ गतीने पुढे जात आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चिंबल जंक्शन येथे सध्या दिवसा प्रमाणेच रात्रीच्यावेळी सुध्दा वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. मात्र याठिकाणी फ्लॉयओव्हरचे काम सुरु असल्याने एकाच लेनमधून वाहने सोडली जात आहे. त्यातच रायबंदरचा रस्ता बंद असल्याने कदंब बसेस तसेच सर्व खासगी बसेसही याच मार्गाने वळवल्या जात असल्याने स्थित अधिकच बिकट होत आहे.

Web Title: Traffic congestion continues on Kadamba Bypass Road