Tourism will flourish again in Goa says health minister vishwajit rane | गोव्यात पर्यटन पुन्हा बहरेल; आरोग्यमंत्र्यांना ठाम विश्वास 

गोव्यात पर्यटन पुन्हा बहरेल; आरोग्यमंत्र्यांना ठाम विश्वास 

पणजी : सध्या ‘कोरोना’चे संकट असले तरी कालांतराने गोव्यात पर्यटन पुन्हा बहरेल आणि या व्यवसायाला गतवैभव प्राप्त होईल, असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केला. 

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात लक्षणीय आहे तसेच कोविड-१९ तपासणीही काटेकोरपणे केली जाते. स्थानिक कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले नाही. परप्रांतातून आलेलेच पॉझिटिव्ह आढळले. सध्या २८ पॉझिटिव्ह रुग्ण असून ४२ जण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण जास्त आहे आणि गोव्यात येणाऱ्या प्रवाशांमध्ये ८0 टक्के महाराष्ट्रातून येतात. 

१४४ कलमाची काय गरज?; आमदार रोहन खंवटेंचा सवाल
आता जवळजवळ सर्व व्यवहारांवरील निर्बंध उठविले असताना १४४ कलम जारी ठेवण्याची गरजच काय? असा सवाल अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला आहे. खंवटे म्हणतात की, ‘केंद्रीय गृह मंत्रालयाने शहरांमधील जवळजवळ सर्वच व्यवहारांवरील निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे आता आणखी १४४ कलमाची गरज नाही.’ मुख्यमंत्र्यांच्या व्याख्येनुसार गोवा ग्रीन झोन आहे याकडेही खंवटे यांनी लक्ष वेधले आहे. याआधी त्यांनी सरकार या कलमाचा विरोधकांविरोधात गैरवापर करीत असल्याचा आरोप केला होता. 

२२ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला त्या दिवशी हे कलम लावले होते. ते नंतर चालूच ठेवले. 

Web Title: Tourism will flourish again in Goa says health minister vishwajit rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.