पणजीत उमेदवारांकडून एकूण ६ कोटींचा खर्च

By Admin | Updated: March 10, 2016 02:02 IST2016-03-10T01:57:31+5:302016-03-10T02:02:44+5:30

पणजी : महापालिका निवडणुकीवेळी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाने अडीच लाख रुपयांची खर्च मर्यादा ठरवून दिली होती

Total expenditure of Rs 6 crores from Panaji candidates | पणजीत उमेदवारांकडून एकूण ६ कोटींचा खर्च

पणजीत उमेदवारांकडून एकूण ६ कोटींचा खर्च

पणजी : महापालिका निवडणुकीवेळी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाने अडीच लाख रुपयांची खर्च मर्यादा ठरवून दिली होती; पण अनेक प्रभागांमध्ये तीन प्रमुख पॅनलांनी व काही अपक्ष उमेदवारांनी केलेला खर्च पाहता एकूण सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा निवडणुकीवेळी खर्च झाल्याचा अंदाज आहे.
काही उमेदवार तसेच काही मतदारांशी संवाद साधला असता, खर्चाचा अंदाज आला. आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर काही जणांनी बरीच माहिती दिली. प्रभागांमध्ये निवडणुकीच्या काळात पैशांचे वाटप झाले. एका घरास काहीजणांनी प्रत्येकी तीन हजार रुपये, तर काहीजणांनी पाच हजार रुपये वितरित केले, असा प्रकार काही प्रभागांमध्ये घडला.
सगळाच खर्च उमेदवार दाखवत नाहीत. खर्चाचा हिशेब देण्यासाठी उमेदवारांना ४५ दिवसांचा अवधी मिळतो. ३0 दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे खर्चाचा अहवाल द्यावा लागतो. जे अहवाल देत नाहीत, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवल्यानंतर मग १५ दिवसांत खर्चाचा हिशेब (पान २ वर)

Web Title: Total expenditure of Rs 6 crores from Panaji candidates