'टायगर पार्क' सांगे किंवा नेत्रावळीत: वनमंत्री राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 14:04 IST2023-03-07T14:03:17+5:302023-03-07T14:04:57+5:30
सांगे किंवा नेत्रावळीत व्याघ्र उद्यान येईल, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

'टायगर पार्क' सांगे किंवा नेत्रावळीत: वनमंत्री राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सांगे किंवा नेत्रावळीत व्याघ्र उद्यान येईल, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. ते म्हणाले कि, बोंडला अभयारण्यात पुरेशा सुविधा नाहीत, त्यामुळे तेथे वाघ आणण्याचा विचार नाही.
बोंडला ऐवजी सांगे किंवा नेत्रावळीत 'टायगर पार्क' विकसित करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर केलेला आहे. वन व्यवस्थापन आराखडा तयार झाल्यानंतर अनेक गोष्टी मार्गी लागतील. बोंडला अभयारण्यासाठी केंद्राकडून काही निधी मिळालेला आहे, असे राणे यांनी सांगितले.
दरम्यान, डोंगर कापणी प्रकरणांमध्ये तसेच सखल भागात बेकायदेशीररित्या मातीचा भराव टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चार विश्वजित यांनी नगर नियोजनमंत्री या नात्याने केला. ते म्हणाले की, काही परवाने मी खात्याचा मंत्री बनण्यापूर्वी दिलेले आहेत. अशा प्रकरणांमध्ये मी हस्तक्षेप करु शकत नाही. कारण कारवाई केली तर संबंधित बिल्डर कोर्टात जातील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"