गवत कापताना दिसले बिबट्यासह तीन बछडे! कलमामळ - बोरी येथील प्रकाराने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 13:40 IST2023-05-27T13:39:05+5:302023-05-27T13:40:45+5:30
तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असून, ते परिसरात लक्ष ठेवून आहेत.

गवत कापताना दिसले बिबट्यासह तीन बछडे! कलमामळ - बोरी येथील प्रकाराने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडाः कलमामळ-बोरी येथील लक्ष्मण जोशी यांच्या बागायतीमध्ये प मादी बिबट्याने तीन पिल्लांना जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण हे नेहमीप्रमाणे शेतात गवत . कापण्यासाठी गेले असता त्यांना कशाचा तरी आवाज आल्याने सावध होऊन त्यांनी पाहिले असता त्यांना बिबट्याचे बछडे दिसून आले. त्यांनी तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असून, ते परिसरात लक्ष ठेवून आहेत.
सविस्तर वृत्तानुसार, कलमामळ . येथे लक्ष्मण जोशी यांची बागायत आहे. तिथेच त्यांच्या गाईच्या गोठा सुद्धा न आहे. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी न बागायतीत गवत कापण्यासाठी गेले असता त्यांना गवताच्या जवळपास गुरगुरण्याचा आवाज आला. त्या आवाजाने त्यांनी तिथून पळ काढला व आपल्या एका मित्राला घेऊन पुन्हा त्या न ठिकाणी आले.
एक लांब काठी घेऊन परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तिथे मादी बिबट्या व तीन बछडे दिसले. लक्ष्मण यांनी मित्रासह तिथून पुन्हा पळ काढला व तातडीने वन खाते व प्राणी मित्रांना माहिती दिली. प्राणी मित्र चरण देसाई व वन खात्याचे पथक तिथे दाखल झाले असून, बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. सध्या तिथे लोकांचे वर्दळ वाढल्यामुळे बिबट्या आपल्या पिलांसह आत असल्याचा संशय आहे. कदाचित रात्री पाणी पिण्याच्या निमित्ताने ती बाहेर येऊ शकते.