तीन सख्खी भांवडे झाली बेपत्ता: शोध चालू

By सूरज.नाईकपवार | Updated: February 10, 2024 21:17 IST2024-02-10T21:16:48+5:302024-02-10T21:17:05+5:30

लोकमत न्युजनेटवर्क मडगाव: तीन सख्खी भावंडे बेपत्ता गोव्यातील कुंकळ्ळी येथून बेपत्ता झाली. पोलिस सद्या त्यांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांचा ...

Three brothers go missing: search continues in goa | तीन सख्खी भांवडे झाली बेपत्ता: शोध चालू

तीन सख्खी भांवडे झाली बेपत्ता: शोध चालू

लोकमत न्युजनेटवर्क

मडगाव: तीन सख्खी भावंडे बेपत्ता गोव्यातील कुंकळ्ळी येथून बेपत्ता झाली. पोलिस सद्या त्यांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांचा थांगपत्ता अजूनही सापडलेला नाही.

हे कुटुंबिय मूळ पश्चिम बंगाल राज्यातील असून, त्या मुलांचे वडील कामगार म्हणून काम करीत आहेत. भादंस कलम ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.पांझरकणी येथे सदया हे कुटुंबिय रहात होते.

आपली मुले बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसात नोंदविली. त्या मुलांची आई सदया हयात नाही. वडिलांनी दुसरा विवाह केला आहे. त्या मुलांचे काही सख्ये नातेवाईक गोव्यात रहात आहे. त्या नातेवाईच्या ठिकाणी जाउनही पोलिसांनी तपास केला. मात्र ती मुले सापडू शकली नाहीत.

Web Title: Three brothers go missing: search continues in goa