गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 16:56 IST2017-10-18T13:53:32+5:302017-10-18T16:56:22+5:30
गोव्याहून सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा बंद राहिली. महाराष्ट्रातील एसटी संपाचा हजारो गोमंतकीय प्रवाशांनाही फटका बसला आहे.

गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद
पणजी : गोव्याहून सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा बंद राहिली. महाराष्ट्रातील एसटी संपाचा हजारो गोमंतकीय प्रवाशांनाही फटका बसला आहे.
गोव्याहून महाराष्ट्रातील एकूण चौदा मार्गांवर रोज 37 बसगाड्या धावतात. महाराष्ट्रातील संपामुळे मंगळवार आणि बुधवारी कदंबच्या बसगाड्या जाऊ शकल्या नाहीत. यामुळे दिवसांत कदंबचे एकूण नऊ लाखांचे उत्पन्न बुडाले. ऐन दिवाळीत गोमंतकीय प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
गोव्याहून कदंबची एसी बसगाडी रात्रीच्या वेळी मुंबईला, शिर्डी, पुणे आणि सोलापुरला गेली. ही नॉन स्टॉप बससेवा आहे. ती महाराष्ट्रातील बसस्थानकात जात नाही.
गोव्याहून कदंब बसगाडीने महाराष्ट्रात रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. कदंब आणि एसटी बसगाड्या बंद राहिल्याने गोमंतकीय प्रवाशांची गैरसोय झाली.
दरम्यान गोवा सरकारने कदंब वाहतूक महामंडळाला नुकताच दहा कोटीचा निधी दिला आहे. कदंबच्या 55 नव्या बसगाड्या येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सज्ज होऊन येतील. त्यापैकी काही बसगाड्या महाराष्ट्रातही प्रवासी वाहतूक करणार आहेत.