१५ जुलैपर्यंत तहान भागणार!

By Admin | Updated: July 1, 2014 01:46 IST2014-07-01T01:41:59+5:302014-07-01T01:46:45+5:30

पणजी : दक्षिण गोव्याची जीवनवाहिनी असलेल्या साळावली धरणाच्या पाण्यात पुन्हा लक्षणीय प्रमाणात मँगनीजचा अंश सापडल्याने शुद्धिकरणात अडथळे येत आहेत.

Thirsty thirsty till 15th July! | १५ जुलैपर्यंत तहान भागणार!

१५ जुलैपर्यंत तहान भागणार!

पणजी : दक्षिण गोव्याची जीवनवाहिनी असलेल्या साळावली धरणाच्या पाण्यात पुन्हा लक्षणीय प्रमाणात मँगनीजचा अंश सापडल्याने शुद्धिकरणात अडथळे येत आहेत. त्यामुळे जलप्रक्रिया सुमारे १० टक्क्यांनी घटली आहे. पावसाने दडी मारल्याने आधीच पाण्याची समस्या निर्माण झालेली असताना, बांधकाम खात्याचा पाणीपुरवठा विभाग मात्र पुढील १५ दिवस पाऊस झाला नाही, तरी पाणीटंचाई भासणार नाही, असा दावा करीत आहे.
सध्या पाण्यातील मँगनीजचा अंश कमी करण्यात यश आल्याचा दावा खात्याचे मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांनी केला. मँगनीजचे प्रमाण प्रती लिटर ०.१ मिलिग्रॅमपेक्षा अधिक झाल्यास ते धोकादायक ठरते. गेल्या आठवड्यात हे प्रमाण प्रतिलिटर २.८ मिलिग्रॅमपर्यंत पोचले होते. शुद्धिकरण प्रक्रियेत त्यामुळे अडचण येत होती. पाणी पुन्हा पुन्हा फिल्टर करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. साळावली प्रकल्पातून रोज सुमारे २०० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो.
(प्रतिनिधी)

Web Title: Thirsty thirsty till 15th July!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.