पणजी मार्केटची तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौ. मीटर जमिनीत येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 21:32 IST2020-08-06T21:31:12+5:302020-08-06T21:32:22+5:30
मार्केटच्या तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौरस मीटर जमिनीत येणार असून, मासळी, मटण बाजाराचीही तरतूद असणार आहे.

पणजी मार्केटची तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौ. मीटर जमिनीत येणार
पणजी : स्मार्ट सिटीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी संपन्न झाली. राजधानी पणजी शहर मार्केट इमारतीच्या तिस-या टप्प्याचे काम लवकरच हाती घेण्याचा निर्णय झाला. मार्केटच्या तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौरस मीटर जमिनीत येणार असून, मासळी, मटण बाजाराचीही तरतूद असणार आहे.
स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, इमेजिन स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेंट लि चे व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्ता पाल चौधरी, नगरसेवक शुभम चोडणकर, नगरसेवक रुपेश हळर्णकर यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर माहिती देताना महापौर म्हणाले की, मनपा क्षेत्रात पणजी तसेच रायबंदर येथे प्रकल्प येतील. पावसाळ्यानंतर ही कामे सुरु होतील. काकुलो सर्कल ते आदर्श कॉलनी, टोंक रस्त्याचे नव्याने बांधकाम केले जाईल. गटार व्यवस्था, भूमिगत केबल्स टाकले जातील. टोंक मलनि:सारण प्रकल्पाजवळ सांतइनेज खाडीवर पूल बांधला जाईल. रायबंदरला नवी मार्केट इमारत, आरोग्य केंद्रासाठी इमारत, मैदान तसेच महापालिकेच्या उपकार्यालयासाठी इमारत येईल. या सर्व कामांसाठी अंदाजपत्रके तयार करण्यास सांगितले आहे. पुढील दोन महिन्यात निविद काढल्या जातील आणि पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामे सुरू होतील.