तेलंगणातील चोरट्याला कळंगुटात अटक; सापळा रचून घेतलं ताब्यात

By काशिराम म्हांबरे | Updated: November 22, 2023 17:17 IST2023-11-22T17:16:59+5:302023-11-22T17:17:34+5:30

बागा येथे केलेल्या कारवाईत मोठ्या शिताफीने पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.

Thief from Telangana arrested in Calanguta; A trap was laid and taken into custody | तेलंगणातील चोरट्याला कळंगुटात अटक; सापळा रचून घेतलं ताब्यात

तेलंगणातील चोरट्याला कळंगुटात अटक; सापळा रचून घेतलं ताब्यात

म्हापसा: काशिराम म्हांबरे, तेलंगणा राज्यातील पोलिसांना घरफोडी तसेच इतर विविध प्रकारच्या चोरी प्रकरणात हवा असलेल्या चोरट्याला कळंगुट पोलिसांनी कळंगुट परिसरातील बागा येथे केलेल्या कारवाईत मोठ्या शिताफीने पकडून तेथील पोलिसांच्या ताब्यात दिले.

निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरटा कळंगुट पोलीस स्थानकाच्या हद्दीत असल्याने तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील बोधान पोलीस स्थानकातल्या पोलिसांनी कळंगुट पोलिसांशी संपर्क साधला होता. दिलेल्या माहितीच्या आधारावर संशयित बागा परिसरात असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना उपलब्ध झाली होती. त्याच्यावर तांत्रिकदृष्ट्या देखरेख ठेवल्यानंतर ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या तेलंगणातील पोलिसांच्या सहकार्याने चोरट्याला अटक करुन त्याच्या ताब्यात देण्यात आले. कळंगुट पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर संशयिताला पकडण्यास यश लाभल्याबद्दल तेलंगणा पोलिसांनी कळंगुट पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Thief from Telangana arrested in Calanguta; A trap was laid and taken into custody

टॅग्स :Arrestअटक