शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शेतक-यांच्या डोळ्यात आता पाणीही दिसणार नाही, ते पूर्णपणे आटलेले आहे - नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 9:45 PM

महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख दिसून येत नाही. त्यांच्या डोळ्य़ात अजिबात पाणी दिसणार नाही, त्यामुळे आता शेतक-यांच्या दु:खाची व्याख्या बदलली आहे असे आपल्याला वाटते, असे मत नाना पाटेकर यांनी बायोस्कोप व्हिलेजमधील कट्टय़ावर मंगळवारी रात्री रंगलेल्या गप्पात व्यक्त केले. सचिन चाटे यांनी त्यांची मुलाखत घेतली. 

पणजी : महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख दिसून येत नाही. त्यांच्या डोळ्य़ात अजिबात पाणी दिसणार नाही, त्यामुळे आता शेतक-यांच्या दु:खाची व्याख्या बदलली आहे असे आपल्याला वाटते, असे मत नाना पाटेकर यांनी बायोस्कोप व्हिलेजमधील कट्टय़ावर मंगळवारी रात्री रंगलेल्या गप्पात व्यक्त केले. सचिन चाटे यांनी त्यांची मुलाखत घेतली. नाना म्हणाले की, तुम्हाला गावातील लोकांची सुख-दु:ख वेगळी असल्याचे दिसेल, त्यासाठी शहरातून गावात गेले पाहिजे. तेथील शेतक-यांच्या डोळ्यात आता पाणीही दिसणार नाही, ते पूर्णपणे आटलेले आहे. नाम फाऊंडेशनचा उद्देश समाजासाठी काहीतरी करण्याचा आहे. आपण भाजपचा प्रचार करीत नाही, पण केंद्र आणि महाराष्ट्रातील सरकार शेतक-यांसाठी काहीतरी करतेय, त्या कामाचे कौतुक केलेच पाहिजे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. आपल्या चित्रपट दिग्दर्शनाविषयी ते म्हणाले की, प्रहार या चित्रपटानंतर त्या क्षेत्रकडे वळलो नाही. पण आता त्यावर काम सुरू आहे, याबाबत आपण अधिक बोलू शकत नाही. गंभीर भूमिकांकडून वेलकममधील विनोदी भूमिकेकडे कसे वळलात, या प्रश्नावर ते म्हणाले की, या चित्रपटात स्वत:ला तोलण्याचा मी प्रयत्न केला. पण या चित्रपटात कॉमेडी करण्यासारखे काहीच नाही. सिक्वेन्सच अशा होत्या की त्या विनोदी वाटतात. बसथांब्यासारखे विसरून जायचेउपस्थितांमधून डॉयलॉग म्हणण्याची विनवणी करण्यात आल्यानंतर नानांनी अत्यंत मार्मिक आणि सोप्या भाषेत उत्तर दिले. ते म्हणाले की, सध्या मी व्यवसायिक झालो आहे. आता बोलायलाही पैसे घेतो. त्यामुळे डॉयलॉग म्हणायलाही पैसे पडतील, असे सांगताच हश्शा पिकल्या. त्याचबरोबर प्रवासाला निघाल्यावर एखादा थांबा आला तर कोणते आहे, ते पहाचे आणि पुढे निघून जायचे. मागचे काही आठवायचे नाही. असेच चित्रपटाचे आहे. पुरस्कारांनी पोट भरत नाही!प्रहार, परिंदा आणि क्रांतिवीर चित्रपटाला मिळालेल्या पुरस्काराचा आठवण करून दिल्यानंतर त्यावर नाना म्हणाले की, पुरस्काराने पोट भरत नाही. आई पूर्वी हातावर बत्ताशा ठेवायची, त्यामुळे पुरस्कार हे बत्ताशाप्रमाणो असतात. खायाला तेवढय़ापुरता तो बत्ताशा गोड लागतो. तसाच प्रकार पुरस्कारांचा आहे. ज्या चित्रपटाला अधिक पुरस्कार मिळतात, तो चित्रपट कोणीच पाहीत नाही, असे आपणास वाटते. शिवाय रस्त्यावरील माणूसही चित्रपट पाहून खूष होतो, त्याचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे असे लोकांना भावणारे आणि आनंद देणारे चित्रपट महत्त्वाचे वाटतात. पूर्वी गोविंद निहलानी, श्याम बेनेगल यांचे चित्रपट त्या धाटणीचे होते, त्यामुळे ते लोकांना लगेच भावत होते, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, संजयलिला भन्साळी यांनी इतिहासावर आधारीत पद्मावती, बाजीराव मस्तानी चित्रपट काढला आपल्याला ते अजिबात पटले नाही. वादाचे कारण बनण्याचे टाळणो कधीही चांगले. नाक कापणो, कोणास मारण्याचा हक्क त्यांना आहे का? जे दुस:याला जीवन देऊ शकत नाहीत, त्यांना मारण्याचा काय अधिकार असा सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर कलाकारांनी कधीही साधेपणाने वागणो अपेक्षित आहे. दहा-बारा अंगरक्षक घेऊन जाणो आपल्याला पटत नाही. कॅमेरापुढे बाजूला गेलो की, साधे जगणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी उदयोन्मुख कलाकारांना दिला. टाळ्या कधी वाजावयाच्या!कट्टे यांच्या एका कोटीवर रसिकांना किंवा श्रोत्यांना टाळ्या वाजवायाला कधी सांगायचे नाही, असे आपणास वाटते कारण त्यांना तेवढे ज्ञान असते की टाळ्या कधी वाजावयाच्या. ज्यावेळी त्यांना एखादी गोष्ट पटती तेव्हा ते टाळ्या वाजवतातच, असे नाना म्हणाले. - नाना पाटेकर तसे हजरजबाबी. त्यांच्या बायस्कोप व्हिलेजमधील कट्टय़ावर गप्पा रंगल्यानंतर नाना पाटेकर स्वत: उभारून चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत होते. त्यामुळे वातावरण अगदी उत्साही झाले होते. त्यातच व्यासपीठावर मुलाखत घेणारे सचिन कट्टे यांनी ह्यहा शेवटचा प्रश्नह्ण असे म्हणताच. नानांनी थांबरे..विचारू दे त्यांना..शेवटचा काय म्हणतोस, असे म्हणत कट्टे यांना थांबविले. त्यानंतर नानांनी पुन्हा प्रश्न-उत्तरांना सुरुवात केली. - तिरंगा चित्रपटातील आठवण करून देताना नाना म्हणाले, लोकांना हा चित्रपट पूर्ण होणार की नाही, याची शाश्वती नव्हती. दोन माथेफिरू या चित्रपटात होते. राजकुमार हे आपल्या वडिलांसारखे असल्याने, त्यात काही करण्याची गरज नव्हती. त्यांचे पाय धरले आणि सांभाळून घ्या, एवढेच म्हणालो.  

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017Nana Patekarनाना पाटेकर