कॅसिनो बंद करण्याची गरज नाही : मुख्यमंत्री
By Admin | Updated: January 3, 2015 01:34 IST2015-01-03T01:25:25+5:302015-01-03T01:34:29+5:30
पणजी : मांडवी नदीत आणखी नव्या तरंगत्या कॅसिनोंना परवाने दिले जाणार नाहीत

कॅसिनो बंद करण्याची गरज नाही : मुख्यमंत्री
पणजी : मांडवी नदीत आणखी नव्या तरंगत्या कॅसिनोंना परवाने दिले जाणार नाहीत; पण सध्या असलेले कॅसिनो बंद करण्याची सरकारला गरज वाटत नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, एखादा व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतर तो अचानक बंद करता येत नाही. सरकारने कॅसिनो बंद केले, तर कॅसिनोचालक न्यायालयात जाऊ शकतात. सध्याचे कॅसिनो काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाले आहेत. त्या वेळीच त्यांना परवाने दिले होते. या कॅसिनोंकडून सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होतो. ते बंद करावेत, असे सरकारला वाटत नाही. कॅसिनो जहाजांना मांडवी नदीपासून थोडे दूर अन्यत्र हलविण्याचा पर्याय सरकार विचारात घेऊ शकते. (खास प्रतिनिधी)