काँग्रेस-गोवा फॉरवर्डमध्ये मतभेद नाहीत: विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:42 IST2025-07-08T12:42:30+5:302025-07-08T12:42:34+5:30
कुडचडे येथे एकाचवेळी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांच्यावतीने लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

काँग्रेस-गोवा फॉरवर्डमध्ये मतभेद नाहीत: विजय सरदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्यात कोणतेही प्रश्न किंवा मतभेद नाहीत असे स्पष्टीकरण गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. काल, सोमवारी सायंकाळी कुडचडे येथे एकाचवेळी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांच्यावतीने लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
याबाबत पत्रकारांनी विचारले असता सरदेसाई म्हणाले की, आम्ही तालुका स्तरावरील सार्वजनिक कार्यक्रमांची आखणी आधीच केली होती. जर याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी विनंती केली असतील तर आजचा कुडचडेमधील कार्यक्रम पुढे ढकलला असता. जे प्रश्न तुम्ही आमच्यासमोर मांडले आहेत, ते आगामी अधिवेशनात मांडेन. त्या विषयावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन.
तो निर्णय वरिष्ठ स्तरावर : युरी आलेमाव
दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, विरोधी पक्ष म्हणून आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आजचा कार्यक्रम खूप दिवसांपूर्वी जाहीर केला होता. काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षांच्या युतीचा प्रश्न याबाबत हायकमांड निर्णय घेईल.