...तर गोवा महाराष्ट्रामध्ये गायब झाला असता : मंत्री रवी नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:22 IST2025-04-20T12:19:15+5:302025-04-20T12:22:26+5:30

हा कार्यक्रम मंत्री नाईक यांच्या कार्यालयात झाला.

then goa would have disappeared into maharashtra said minister ravi naik | ...तर गोवा महाराष्ट्रामध्ये गायब झाला असता : मंत्री रवी नाईक

...तर गोवा महाराष्ट्रामध्ये गायब झाला असता : मंत्री रवी नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील राजकारणात, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. हे केवळ ओपिनियन पोल झाल्यामुळे शक्य झाले. त्यावेळी गोवा महाराष्ट्रामध्ये विलीनीकरण करण्यावर ओपिनियन पोल झाला नसता तर गोव्याला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसता व आज गोवा महाराष्ट्राचा भाग बनला असता. असे झाले असते तर आपल्याला कोणी विचारलेही नसते. गोवेकर महाराष्ट्रामध्ये गायब झाले असते. गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला वेगळी ओळख मिळाली, असे मत कृषिमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केले.

फोंडा विकास समिती यांच्यातर्फे साहित्यिक मिलिंद म्हाडगुत यांनी लिहिलेल्या 'गोमंतकीय राजकारणातील बदलते प्रवाह' या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नाईक बोलत होते. व्यासपीठावर राजू नायक, फोंडा विकास समितीचे राम कुंकळ्येकर, प्रकाशक विद्या म्हाडगुत, लेखक मिलिंद म्हाडगुत उपस्थित होते.

हा कार्यक्रम मंत्री नाईक यांच्या कार्यालयात झाला. मंत्री नाईक म्हणाले, आज राज्यात शिक्षणाचा दर्जा वाढला आहे. अनेक संस्था चांगले नागरिक घरवण्यासाठी हातभार लावत आहेत

Web Title: then goa would have disappeared into maharashtra said minister ravi naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.