गोव्यात वार्का येथे मॅगसनस सुपरमार्केटमध्ये चोरी, ७३ हजारांची रोकड पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 20:41 IST2020-03-04T20:41:46+5:302020-03-04T20:41:52+5:30
कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सपना गावस पुढील तपास करीत आहेत.

गोव्यात वार्का येथे मॅगसनस सुपरमार्केटमध्ये चोरी, ७३ हजारांची रोकड पळविली
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यातील किनारपटटीभागातील वार्का येथील मॅगसनस सुपरमार्केटमध्ये अज्ञात चोरटयांनी चोरी करुन ७३ हजारांची रोकड पळविली. बुधवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यासंबधी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. चोरटयाने चेहऱ्यावर मास्क घालून ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. भारतीय दंड संहितेच्या ३८0 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.
कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सपना गावस पुढील तपास करीत आहेत. तपासात पोलिसांनी सुपरमार्केटच्या वरच्या मजल्यावरील खिडकी उघडी होती असे आढळून आले आहे. या खिडकीतून चोरटा आत शिरला व त्याने ड्रॉव्हर फोडून आतील रोकड लंपास केली. सुपरमार्केटात सुरक्षा रक्षकही नव्हता असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना एक व्हिडीओ क्लिप मिळाली आहेत. त्यात या सुपरमार्केटाच्य बाहेर एक बुरखाधारी इसम उभा असल्याचेही दिसत आहे. एकंदर या चोरीप्रकरणात दोघांचा समावेश असावा असा पोलिसांनी कयास आहे. चोरीसंबधी तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. श्वानपथक तसेच ठसेंतज्ञालाही पाचारण करण्यात आले.