पोटच्या मुलांना फिनेल पाजून आईचाही आत्महत्येचा प्रयत्न
By काशिराम म्हांबरे | Updated: July 2, 2024 15:40 IST2024-07-02T15:38:50+5:302024-07-02T15:40:15+5:30
या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी त्या मुलांच्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोटच्या मुलांना फिनेल पाजून आईचाही आत्महत्येचा प्रयत्न
म्हापसा : पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सुकूर पंचायत क्षेत्रातील एका महिलेने फिनेल प्राशन करुन स्वताला संपवण्याचा तसेच आपल्या पोटच्या दोन अल्पवयिन मुलांनाही फिनेल पाजून मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी त्या मुलांच्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या दोन्ही मुलांवर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात तर आईवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घडलेल्या प्रकारानंतर त्या मुलांच्या पिताने आपल्या पत्नी विरोधात पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे.
या घटने मागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी पती पत्नीतील वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली. घटना काल १ जुलै रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. या संबंधीचा तपास निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लावरीन सिक्वेरा यांच्या वतिने सुरु करण्यात आला आहे.