खळबळजनक! माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या मानेवर केले चाकूचे ३५ वार

By वासुदेव.पागी | Updated: September 2, 2023 18:11 IST2023-09-02T18:11:17+5:302023-09-02T18:11:40+5:30

पर्वरी येथी तिचा खून करून निरुपडी करकात नावाच्या आपल्या मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकला होता.

The headstrong boyfriend stabbed his girlfriend 35 times on her neck in panaji | खळबळजनक! माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या मानेवर केले चाकूचे ३५ वार

खळबळजनक! माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या मानेवर केले चाकूचे ३५ वार

पणजी: आपली प्रेयसी आपल्याशी प्रेमसंबंध तोडते आहे असा संशय आल्यामुळे माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या  मानेवर चाकूचे सपासप ३५ वार करून तिला ठार मारले. तिच्या मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून हे उघड झाले आहे. कामाक्षी उडापनोव या ३० वर्षीय युवतीचा खून केल्यामुळे फकीर ऊर्फ प्रकाश चुंचवाड याला पर्वरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. 

दोघांचेही प्रेमप्रकरण सुरू होते असे पोलीस तपासातून उघड झाले आहे. तसेच अलीकडच्या काळात कामाक्षी फकीरला टाळण्याचा प्रयत्न करीत होती. त्याच्या लहरी स्वभावाला ती वैतागल्याचेही सांगितले जाते. आपल्याला  कामाक्षी टाळत असल्याचे लक्षात आल्यामुळे फकीरला तिच्यावर संशय येऊ लागला. तिचे दुसऱ्याकुमाकडे तरी सूत जुळले असावे असा संशय घेऊन तिला कायमचा संपविण्यासाठी त्याने कारस्थान आखले आणि त्याची अंमलबजावणीही केली. पर्वरी येथी तिचा  खून करून निरुपडी करकात नावाच्या आपल्या मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकला होता. कामाक्षी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी नोंदविल्यानंतर तपास सुरू झाला आणि या खुनाचा छडा लागला.

Web Title: The headstrong boyfriend stabbed his girlfriend 35 times on her neck in panaji