पत्नी व सासुच्या दुहेरी खून प्रकरणात संशयित अनुरागचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By सूरज.नाईकपवार | Updated: January 18, 2024 15:37 IST2024-01-18T15:36:34+5:302024-01-18T15:37:00+5:30
हुंडयासाठी अनुराग याने नियोजनबध्दरित्या व हेतुपरस्पर आपली पत्नी शिवानी व सासु जयदेवी या दोघांचा खून केल्याबद्दल वास्को पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद करुन नतर त्याला अटक केली होती. शुभम सिंग यांनी हे प्रकरण धसास लावले होते.

पत्नी व सासुच्या दुहेरी खून प्रकरणात संशयित अनुरागचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
मडगाव: पत्नी व सासुच्या दुहेरी खून प्रकरणात वास्को पोलिसांनी अटक केलेला नौदल अधिकारी अनुराग सिंग राजवत याचा जामिनाचा अर्ज आज गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला, दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात संशयिताने हा अर्ज केला हाेता. या अर्जावर संशयिताचा मेव्हणा शुभम सिंग यांनी हस्तक्षेप अर्जही दाखल केला होता. हुंडयासाठी अनुराग याने नियोजनबध्दरित्या व हेतुपरस्पर आपली पत्नी शिवानी व सासु जयदेवी या दोघांचा खून केल्याबद्दल वास्को पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद करुन नतर त्याला अटक केली होती. शुभम सिंग यांनी हे प्रकरण धसास लावले होते.
१८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी गॅसचा भडका उडून शिवानी व तिची आई जयदेवी या दोघांचा होरपळून नंतर मृत्यू झाला होता. प्रथमदृष्टी हे प्रकरण सिलिंडर गॅस गळतीचे वाटत होते. विवाहाच्या सात वर्षाच्या आत शिवानीचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण मुरगावचे विभागीय न्यायदंडाधिकारी भगवंत करमली यांनी हाताळून चौकशीनंतर आपला ९० पानांचा अहवाल वास्को पाेलिसांना सादर केला होता. मागाहून या प्रकरणी संशयितावर खुनाचा गुन्हा नोंद करुन पोलिसांनी त्याला अटक केली होती. सदया संशयित वास्को पोलिस कोठडीत आहे.