गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-याला दहा हजार रुपयांचा दंड
By Admin | Updated: August 8, 2016 16:19 IST2016-08-08T16:19:40+5:302016-08-08T16:19:40+5:30
गोव्यात आता मद्यपान करणे पर्यटकांना चांगलेच महागात पडणार आहे. गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-याला दहा हजार रुपयांचा दंड
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 8 - गोव्यात आता मद्यपान करणे पर्यटकांना चांगलेच महागात पडणार आहे. गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा विधानसभेत नवीन दुरुस्ती करण्यात आलेला राज्य उत्पादन शुल्क कायदा मांडण्यात आला. या कायद्यानुसार गोव्यात ठिकठिकाणी मद्यपान निषेध असलेले फलक लावण्यात येणार आहेत. फलक लावलेल्या परिसरात जर कोणी मद्यपान करताना आढळल्यास त्या मद्यपीला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
गोव्यात येणा-या पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी, समुद्र किनारे आणि रस्त्यांवर मद्यपान करण्याच्या अनेक तक्रारी पाहता गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे.