शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे दहा आमदार फुटले होते, भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 16:54 IST

विरोधी काँग्रेस पक्षाचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास सज्ज झाला होता पण भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींनी यास मान्यता दिली नाही.

पणजी - विरोधी काँग्रेस पक्षाचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास सज्ज झाला होता पण भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींनी यास मान्यता दिली नाही, कारण आम्हाला कोणताच पक्ष आता अस्थिर करायचा नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी केला.सरचिटणीस नरेंद्र सावईकर व सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत तेंडुलकर यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी बरेच कोटी रुपये भाजपने आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला होता. आमच्याकडे रेकॉर्डीगही आहे, असे चोडणकर म्हणाले होते. त्या पाश्र्वभूमीवर बोलताना तेंडुलकर म्हणाले की चोडणकर हे काहीही आरोप करत आहेत. त्यांनी रेकॉर्डिग असल्यास जाहीर करावे. रेकॉर्डिगमधील आवाज कुणाचा ते तरी कळून येईल. ज्यावेळी सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले तेव्हा देखील पैशांचा व्यवहार झाला नव्हता. मी स्वत: हे सांगू शकतो. आता आम्ही कुणीच भाजप नेते काँग्रेसच्या कुठच्याच आमदाराशी चर्चा देखील केलेली नाही. त्यांना आम्ही आमच्या पक्षातही बोलवलेले नाही. कारण भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे एकूण तेवीस आमदारांचे संख्याबळ आहे आणि तेवढे संख्याबळ स्थिर सरकारसाठी एकदम पुरेसे आहे. 

तेंडुलकर म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांतीलच एक गोष्ट आपण सांगतो. काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार झाला होता. आम्ही व भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही यास मान्यता दिली नाही. चोडणकर यांचे काँग्रेसच्या कुठच्याच आमदारावर नियंत्रण राहिलेले नाही. काँग्रेसचे आमदार सैरभैर आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे, की देशात आणि गोव्यातही पुढील पंचवीस वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. आम्हाला गोवा सरकार स्थिर ठेवायचे आहे व त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आम्ही भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. फ्रान्सिस सिल्वेरा किंवा क्लाफास डायस हे जी वक्तव्ये करत आहेत, त्यांना आम्ही रोखू शकत नाही पण आम्ही पक्षात कुणाला घेणार नाही.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस