गोव्यातील चिंचणी येथे अपघातात टेम्पो चालक ठार: अन्य दोघेजण जखमी
By सूरज.नाईकपवार | Updated: December 17, 2023 18:40 IST2023-12-17T18:40:25+5:302023-12-17T18:40:49+5:30
मडगाव: गोव्यातील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुकाल्डे चिंचणी येथे आज रविवारी सकाळी टेम्पाे व दुचाकीमध्ये अपघात होउन जखमी टेम्पो ...

गोव्यातील चिंचणी येथे अपघातात टेम्पो चालक ठार: अन्य दोघेजण जखमी
मडगाव: गोव्यातील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुकाल्डे चिंचणी येथे आज रविवारी सकाळी टेम्पाे व दुचाकीमध्ये अपघात होउन जखमी टेम्पो चालकाचा मृत्यू झाला तर त्या वाहनातील क्लिनर व दुचाकी चालक जखमी झाले. बिपीन ओरम (२६) असे मयताचे नाव आहे तो बेतुल येथे रहात होता अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली.
अपघातात जखमीची नावे बिपीन नायर ( टेम्पो क्लिनर) व वेलेंनसिया रॉड्रिगिस ( दुचाकी चालक ) अशी आहेत. सकाळी साडेनउच्या सुमारास अपघाताची वरील दुर्घटना घडली. बिपिनला येथील इस्पितळात दाखल केले असता, तो मृत पावल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्य जखमीवर सदया उपचार चालू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी घटनास्थळी जाउन अपघाताचा पंचनामा केला. पुढील पोलिस तपास चालू आहे.