पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग, फोंडा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:56 IST2019-10-17T14:55:35+5:302019-10-17T14:56:20+5:30
या प्रकरणात फोंडा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग, फोंडा तालुक्यातील घटना
मडगाव: फोंडा तालुक्यातील एका सरकारी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाकडून पाच अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात फोंडा पोलिसांनी सदर शिक्षकाला अटक करुन न्यायालयासमोर सादर केले असता त्याला रिमांड देण्यात आला.
अटक केलेल्या शिक्षकाचे नाव मनोज फडते (55) रहाणारा सांत इस्तेव (तिसवाडी) असे असून शाळेच्या अंतर्गत समितीने केलेल्या तक्रारीवरुन बुधवारी रात्री सदर शिक्षकाला त्याच्या निवासस्थानावरुन अटक करण्यात आली. सदर शिक्षकाकडून त्या मुलींना गैरप्रकारे स्पर्श करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या शाळेतील महिला समूपदेशकाकडे त्या मुलींनी सदर शिक्षक आपल्याला कशाप्रकारे स्पर्श करतो याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात फोंडा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.