विकसित भारताचा मार्ग 'स्वदेशी'ने मोकळा; जीएसटी सुधारणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:06 IST2025-09-22T12:01:48+5:302025-09-22T12:06:36+5:30

मुख्यमंत्री सावंत यांनी मंत्री, आमदार, झेडपी, नगरसेवक यांना 'स्वदेशी अपनाओं' व नेक्स जनरेशन जीएसटीबाबत व्हर्चुअल पद्धतीने संबोधले.

swadeshi paves the way for a developed India cm pramod sawant welcomes gst reforms | विकसित भारताचा मार्ग 'स्वदेशी'ने मोकळा; जीएसटी सुधारणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

विकसित भारताचा मार्ग 'स्वदेशी'ने मोकळा; जीएसटी सुधारणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'विकसित भारताचा मार्ग स्वदेशीने मोकळा झाला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जीएसटी दर सुधारणांचे स्वागत केले. ते म्हणाले की, जीएसटी, आयबीसी, आत्मनिर्भर भारत अभियान आणि पीएलआय यांसारख्या सातत्यपूर्ण सुधारणांद्वारे भारताने मेक इन इंडिया ते मेक फॉर द वर्ल्ड असा प्रवास सुरू केला आहे. आज आपण आत्मनिर्भर भारत २.० च्या युगात प्रवेश करीत आहोत. नागरिक देवो भव या दृष्टिकोनातून नेक्स्ट जनरेशन जीएसटी लाँच केले.

मुख्यमंत्री सावंत यांनी काल मंत्री, आमदार, झेडपी, नगरसेवक यांना 'स्वदेशी अपनाओं' व नेक्स जनरेशन जीएसटीबाबत व्हर्चुअल पद्धतीने संबोधले. याप्रसंगी त्यांच्यासोबत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, तसेच राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'जीएसटी बचत उत्सवाची ही सुरुवात आहे. एमएसएमईसाठी परिसंस्था मजबूत करा, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करा, व्होकल फॉर लोकल, थिंक ग्लोबल या दृष्टिकोनासह उत्पादन स्पर्धात्मकता वाढवा, या मोदींनी केलेल्या आवाहनांची पूर्तता करण्यासाठी गोवा पूर्णपणे वचनबद्ध आहे. पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया सुलभ करणे आणि उद्योजकांना सक्षम करू, जेणेकरून स्वदेशी उत्पादने भारतात आणि जगभरात अभिमानाने चमकू शकतील.'

बचत उत्सव राज्यास लाभदायक : मंत्री राणे

राज्यातही जीएसटी बचत उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. स्वदेशीचा अंगीकार, मेड इन इंडियाला पाठबळ आणि प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला या सुधारणा लाभदायी ठरणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जीएसटी बचत उत्सवावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. राणे म्हणाले की, केंद्र-राज्य समन्वयातून या ध्येयपूर्तीला चालना मिळेल आणि गोवा तसेच भारत अधिक सक्षम, आत्मनिर्भर व समृद्ध भविष्याकडे वाटचाल करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी बचत उत्सवाची घोषणा केली आहे. मोदी यांनी मांडलेले 'वन नेशन, वन टॅक्स' हे स्वप्न आता साकार झाले असून कमी जीएसटी दर, वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न, नव मध्यमवर्गीयांसाठी दिलासा या सुधारणा महत्त्वपूर्ण आहेत.

 

Web Title: swadeshi paves the way for a developed India cm pramod sawant welcomes gst reforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.