शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मोबाईलच्या वापरामुळे गोव्यात 280 वाहन चालकांचे परवाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 3:56 PM

धावत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर करण्याचे फॅड गोव्यात वाढले असून या प्रकारावर अंकुश आणण्यासाठी आता वाहतूक पोलिसही सतर्क झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात गोव्यात अशाप्रकारचे 2225 गुन्हे नोंद झाले

ठळक मुद्देगोव्यात पहिल्या 9 महिन्यात 2225 जणांकडून चालत्या वाहनांवर मोबाईल वापरण्याचा गुन्हा ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 र्पयत 87 जणांचे परवाने निलंबितयावर्षीच्या शेवटच्या तीन महिन्यात गुन्हय़ांची संख्या अधिकच वाढण्याची शक्यता

 मडगाव - धावत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर करण्याचे फॅड गोव्यात वाढले असून या प्रकारावर अंकुश आणण्यासाठी आता वाहतूक पोलिसही सतर्क झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात गोव्यात अशाप्रकारचे 2225 गुन्हे नोंद झाले असून आतार्पयत 280 वाहन चालकांचे वाहन परवाने तात्पुरत्या काळासाठी निलंबित  करण्यात आले आहेत.

चालत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर केल्यास वाहन चालकाला दंड आकारण्याबरोबरच तीन महिन्यासाठी त्याचा वाहन परवाना निलंबित  करण्याची तजवीज कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचा आदेश देऊन कित्येक काळ लोटला तरी गोव्यात ऑक्टोबर 2016 पासूनच ही पध्दत सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत अशाप्रकारचे 775 गुन्हे नोंद झाले होते आणि त्यात 87 वाहन चालकांचे परवाने निलंबित  करण्यात आले होते. यंदा पहिल्या 9 महिन्यात 280 जणांचे परवाने निलंबित  करण्यात आले आहेत. जुलै 1 ते सप्टेंबर 30, 2017 या शेवटच्या तीन महिन्यात अशाप्रकारचे 977 गुन्हे नोंद झाले आहेत व 117 जणांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशाप्रकारच्या गुन्हय़ासाठी दंडाचीही तरतूद असून खासगी वाहन चालकांसाठी 600 रुपये तर सार्वजनिक वाहन चालकांसाठी 700 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. वाहतूक पोलीस व वाहतूक खाते या दोघांनीही मोहीम कडक केली असली तरी गुन्हय़ांचे प्रमाण नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच असल्याचे आतार्पयतच्या प्रकरणावरुन निदर्शनास आले आहे.वाहतूक पोलीस विभागाचे उपअधिक्षक धर्मेश आंगले यांनी या वाढत्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करताना, आता वाहन चालकांमध्येच शिस्त येण्याची गरज व्यक्त केली. केवळ पोलीस बघतात म्हणून अशाप्रकारचे गुन्हे न करता मुळातच जबाबदारीने वाहन चालवून गुन्हे होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या शेवटच्या तीन महिन्यात गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे या शेवटच्या तीन महिन्याच्या कालावधीत हे प्रमाण अधिक वाढणार आहे त्यामुळे आम्हीही अधिक सतर्कता बाळगणार असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवा