आलेक्स सिक्वेरा कॉँग्रेसमधून निलंबित
By Admin | Updated: August 24, 2014 00:50 IST2014-08-24T00:47:49+5:302014-08-24T00:50:35+5:30
पणजी : कॉँग्रेसचे माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना निलंबित करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर टीका केल्यामुळे

आलेक्स सिक्वेरा कॉँग्रेसमधून निलंबित
पणजी : कॉँग्रेसचे माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना निलंबित करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर टीका केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी ही कारवाई केल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. फळदेसाई कॉँग्रेसचे जिल्हा प्रमुख होते आणि लोकसभा निवडणुकीत निवडणूक एजंटही होते; परंतु त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचे अनेक पुरावे पक्षाला मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारीही होत्या. निलंबनापूर्वी स्पष्टीकरण मागणारी रीतसर नोटीस त्यांना बजावली होती. त्यामुळे पक्षाच्या निर्णयावर टीका करून सिक्वेरा यांनी शिस्तभंग केला. पक्षाच्या निर्णयाशी सहमत नसल्यास आपली नापसंती कळविण्यासाठी पक्षात व्यासपीठ आहे. थेट माध्यमांकडे जाण्याची गरज नव्हती, असे कुतिन्हो म्हणाल्या.
पक्षविरोधी कारवायांसाठी आतापर्यंत सिक्वेरा यांच्यासह वालंका आलेमाव आणि सुभाष फळदेसाई, या तिघांना निलंबित केले आहे. ज्योकिम आलेमाव, फ्रान्सिससार्दिन, रवी नाईक यांच्यासह इतर काहीजणांना नोटिसा बजावल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.