शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात दर चोवीस तासांत एका मद्यपी वाहन चालकाचा परवाना निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:35 IST

गोव्यात दर चोवीस तासांत एका मद्यपी वाहन चालकाचा परवाना पोलीस आणि वाहतूक खात्याकडून मिळून निलंबित केला जात असतो. गेल्या तीन महिन्यांमधील सरकारी आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.

पणजी - गोव्यात दर चोवीस तासांत एका मद्यपी वाहन चालकाचा परवाना पोलीस आणि वाहतूक खात्याकडून मिळून निलंबित केला जात असतो. गेल्या तीन महिन्यांमधील सरकारी आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. गेल्या तीन महिन्यांत एकूण 272 वाहन चालकांचे विविध प्रकारच्या वाहतूक नियमांचा भंग केल्याबाबत परवाने निलंबित झाले आहेत. यात 115 मद्यपी वाहन चालकांच्या परवान्यांचा समावेश आहे.

वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना अनेक चालक आढळतात. अशा 117 चालकांचे परवाने गेल्या तीन महिन्यांत निलंबित करण्यात आल्याची नोंद वाहतूक खात्याने केली आहे. मालवाहू वाहनामधून प्रवाशांची वाहतूक करत असल्याबाबत 26 चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. मालवाहू वाहनात मर्यादेपेक्षा जास्त माल घातल्याने सहाजणांचे परवाने निलंबित करण्यात आले. अतीवेगाने वाहन हाकल्याबाबत आठजणांचे परवाने निलंबित करण्यात आले. राज्यात अपघातांचे प्रमाण गेल्यावर्षाच्या तुलनेत आता थोडे कमी झाले आहे. जानेवारी 2016 ते सप्टेंबर 2016 र्पयत एकूण 3 हजार 28 वाहन अपघात झाले होते व त्यात 244 व्यक्तींचे बळी गेले होते. अपघातांमध्ये 1 हजार 419 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2017 पर्यंत वाहन अपघातांची संख्या 2 हजार 826 पर्यंत खाली आल्याची नोंद वाहतूक खात्याने केली आहे. एकूण 235 व्यक्तींचे बळी या अपघातांमध्ये गेले. शिवाय 1308 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. वाहतूक नियमांचे व्यवस्थित पालन व्हावे म्हणून वाहतूक खात्याने व वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या कारवाई मोहीमेमुळेही अपघातांचे प्रमाण कमी होण्यास थोडी मदत झाली असे अधिका-यांचे म्हणणे आहे. मात्र प्रमाण अजून कमी व्हायला हवे, अशी सूचना सरकारने अधिका:यांना केलेली आहे. डिसेंबर महिन्यात गोव्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. हजारो अतिरिक्त वाहने गोव्यात फिरत असतात. या काळात रस्त्यावर जास्त  प्रमाणात काळजी घेणो गरजेचे बनते.

दरम्यान, ज्या खासगी कारगाडय़ांचा वापर पर्यटक टॅक्सी म्हणून केला जात आहे, अशा वाहनांविरुद्धही गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक खात्याने मोहीम सुरू केली आहे. शंभरच्या आसपास अशा कारगाडय़ांविरुद्ध कारवाई झाली असल्याचे खात्याच्या अधिका-यांचे म्हणणो आहे.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसCrimeगुन्हा