सरकारी छापखान्यातील ४ कर्मचारी निलंबित

By Admin | Updated: December 3, 2015 01:47 IST2015-12-03T01:46:58+5:302015-12-03T01:47:08+5:30

पणजी : राज्याच्या सरकारी छापखान्यातील ४ कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी काम न करता

Suspended 4 employees in government printing | सरकारी छापखान्यातील ४ कर्मचारी निलंबित

सरकारी छापखान्यातील ४ कर्मचारी निलंबित

पणजी : राज्याच्या सरकारी छापखान्यातील ४ कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी काम न करता संपावर गेल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
आपल्या प्रदीर्घ प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या छापखान्यातील चार कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तांत्रिक विभागाचे प्रमुख कृष्णा बोडणेकर, फातिमा आरावजो, श्याम मोरजकर व कृष्णनाथ वेर्णेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या निलंबनाचा आदेश छपाई आणि मुद्रण खात्याचे संचालक संजीव गडकर यांनी काढला; परंतु त्या कर्मचाऱ्यांना असा आदेश अद्याप देण्यात आलेला नाही. शुक्रवारी आदेशाच्या प्रती त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती गडकर यांच्याकडून देण्यात आली.
दरम्यान, निलंबनाची माहिती मिळताच सर्व कर्मचाऱ्यांनी छापखाना व मुद्रण खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांना आपल्या समस्या सांगितल्या. त्यामुळे ढवळीकर यांनी हस्तक्षेप करत निलंबनाचा आदेश तूर्त स्थगित ठेवण्याची सूचना खात्याला केली आणि त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलंबनाचे आदेश स्थगित ठेवलेले नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: Suspended 4 employees in government printing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.