शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

इफ्फीतून दोन सिनेमे वगळण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 5:48 PM

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) न्यूड आणि एस. दुर्गा हे दोन चित्रपट वगळण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी समर्थन केले.

पणजी : गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) न्यूड आणि एस. दुर्गा हे दोन चित्रपट वगळण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी समर्थन केले.येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना न्यड व अन्य सिनेमा का वगळण्यात आला आहे हे विचारले. पर्रीकर म्हणाले की, आपण या प्रकरणी चौकशी करून घेतली आहे. न्यूड हा मराठी सिनेमा पूर्ण झालेला नसल्याने त्याला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यामुळे ज्यूरी मंडळाने निवडून देखील इंडियन पॅनोरमामधून तो वगळण्यात आला असल्याची माहिती आपणास गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षांनी दिली आहे.पर्रीकर म्हणाले की, कोणताच सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राशिवाय इफ्फीत दाखविता येत नाही. दुर्गा हा सिनेमा केरळ आणि अन्य दोन ठिकाणी दाखविण्यात आला आहे पण तिथे तो कट लावून म्हणजेच काही दृश्ये वगळून दाखविण्यात आला. समाजात तेढ निर्माण होऊ नये या हेतूने कट लावणे गरजेचे ठरले होते. गोव्यात इफ्फीमध्ये तो दाखविण्यासाठी कट न लावताच मंजुर केला गेला होता. त्यामुळे आता तो वगळण्यात आला. केंद्र सरकारने स्वतःच्या अधिकारांनुसार हा निर्णय घेतला असावा असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांच्या एका चित्रपटाला काही वर्षांपूर्वी इफ्फीमध्ये दाखविण्यात अडचण निर्माण झाली होती. कारण त्याना सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले नव्हते. त्यावेळी आपण सेन्सॉर बोर्डच्या तत्कालीन अध्यक्ष शर्मिला टागोर यांच्याशी बोलून तालक यांच्या सिनेमासाठी सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या दृष्टीने विनंती केली होती. ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच आम्ही इफ्फीत त्यांचा सिनेमा दाखवू शकलो होतो. न्यूड सिनेमा तर अजून पूर्णच झालेला नाही.काही जण उगाच वाद निर्माण करत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा