‘सूचना सेठ मानसिकदृष्ट्या ठीक’; वैद्यकीय तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर
By वासुदेव.पागी | Updated: February 14, 2024 18:37 IST2024-02-14T18:35:18+5:302024-02-14T18:37:01+5:30
तिचे मानसिक आरोग्य हे चांगले असल्याचा निर्वाळा वैद्यकीय तपासणीतून देण्यात आला आहे

‘सूचना सेठ मानसिकदृष्ट्या ठीक’; वैद्यकीय तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर
वासुदेव पागी, पणजी: स्वत:च्या ४ वर्षांच्या वयाच्या मुलाचा खून करून सुटकेसमध्ये घालून घेऊन जाणाऱ्या बंगळूरस्थित आयटी कंपनीच्या सूचना सेठ ही कायद्याच्या कारवाईतून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसते. कारवाईपासून पळ काढण्यासाठी आपले मानसिक आरोग्य स्थिर नसल्याचा दावा ती करत आहे. पण तिचे मानसिक आरोग्य हे चांगले असल्याचा निर्वाळा वैद्यकीय तपासणीतून देण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल न्यायालयात सेदर करण्यात आला आहे.
आपल्याच मुलाचा खून करण्याच्या प्रकरणात न्यायालीन कोठडीत असलेली सूचना सेठ हिचे वडील जॉयगोपाल सेठ यांनी सूचनाच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्न उप स्थित केले होते. ती मानसिक ट्ष्ट्या ठीक नसल्यामुळे तिच्या मानसिक आरोग्याची आणखी एकदा चाचणी करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या तपासणीचा वैद्यकीय अहवाल न्यायालयाला सादर केला असून त्यात सूचनाला मानसिक आरोग्य साान्य असल्याचे म्हटले आहे.