राज्यात तुळशी विवाहाची जय्यत तयारी; साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:01 IST2023-11-23T17:00:42+5:302023-11-23T17:01:50+5:30
पुजेसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

राज्यात तुळशी विवाहाची जय्यत तयारी; साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
नारायण गावस, पणजी - गोवा: उद्या तुळशिविवाह असल्याने सध्या राज्यभरातील बाजारपेठ्यामध्ये तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य विक्रीस दाखल झाले आहे. पणजी मार्केटमध्ये तुळशी विवाहसाठी लागणारे साहित्य ऊस, चिंचेची फांदी, आवळ्याची फांदी, डिण्याचे झाड, ताडमाड व आंब्याच्या ताळ विक्रीस आले आहे. एकत्र केलेले हे साहित्य १५० ते २०० रुपये दराने विकले जात आहे. बहुतांश ऊस हे परराज्यातून गाेव्यात विक्रीस आणले. ठिकठिकाणी रस्त्यावर ते विकले जात आहे.
तुळशीवृदांवने सजविली
राज्यात तुळशीविवाहाची जय्यत तयारी सुरु असून उद्या मोठ्या उत्साहात तुळशी विवाह सोहळा घराघरात साजरा केला जाणार आहे. यासाठी लोकांनी आपली तुळशी वृदांवने रंगरंगाेटी केली आहे. तसेच त्याच्यावर विद्यूत राेषणाई साेडली आहे. राज्यात बऱ्याच जणांच्या घरी ब्राह्मणांच्या हस्ते तुळशीची पूजा करून मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न केले जाते. त्यानंतर सुवासिनी जोडवी पेटवून तुळशीची ओवाळणी करतात.
काही ठिकाणी लाेक स्वत:च लग्न लावत असतात. राज्यात तुळशिवावाह माेठी दिवाळी म्हणूनही संबाेधले जाते. दसरा, दिवाळी उत्सव साजरा झाल्यानंतर तुळशीविवाह उत्सव लगभग सुरु होते. दिवाळीच्या बाराव्यादिवशी साजरी केली जाते. दिवाळीसाठी घरासमोर लावलेले आकाशदीप, विजेची रोषणाई, नित्य रात्री पणत्यांची केली जाणारी आरास ही तुळशीच्या लग्नापर्यंत चालू ठेवलेली असते.
तुळशीविवाहाला लागणारा दिंडा, ऊस, चिंच, आवळे, याच्याबरोबर पोहे चुरमुरे, लाह्या, जोडवी, तुळशीच्या लग्नाचे साहित्य उपलब्ध खरेदी केली जात आहे. पूर्वी लाेक चिरमुरे, लाह्या वाटायचो आता लाडू मिठाई वाटत आहे. पण आता काही लाेक बदलत्या काळानुसार आईस्क्रीम वाटत आहेत.