शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

गोव्यात समुद्र किनाऱ्यानजीक मच्छिमारी करणाऱ्या 54 ट्रॉलर्सवर कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 13:13 IST

समुद्र किनाऱ्यापासून पाच किलोमिटर अंतराच्या आत ट्रॉलर्सना मच्छिमारी करण्यास मनाई असूनही गोव्यात अनेक ट्रॉलर्सवाले किनाऱ्याच्या अगदीजवळ मासेमारी करताना आढळून आले आहेत. अलीकडच्या काळात अशा ५४ ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात आली.

पणजी- समुद्र किनाऱ्यापासून पाच किलोमिटर अंतराच्या आत ट्रॉलर्सना मच्छिमारी करण्यास मनाई असूनही गोव्यात अनेक ट्रॉलर्सवाले किनाऱ्याच्या अगदीजवळ मासेमारी करताना आढळून आले आहेत. अलीकडच्या काळात अशा ५४ ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात आली. दुसरीकडे शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कारवार, केरळपर्यंतचे ट्रॉलर्स गोव्यापर्यंत येऊन मासेमारी करीत असल्याने पारंपरिक मच्छिमारांना त्याचा उपद्रव होत आहे.

५४ ट्रॉलर्सची सबसिडी रोखून धरण्यात आली आहे. यापुढे असे प्रकार आढळून आल्यास कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा खात्याचे मंत्री विनोद पालयेंकर यांनी दिला आहे. नियमभंग केल्याबद्दल या ट्रॉलर्सना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. या ट्रॉलर्सना इंधनासाठी दिली जाणारी सबसिडी रोखण्यात आली आहे.१२ नॉटिकल मैल सागरी अंतरापर्यंत नियमितपणे खात्याच्या गस्तीनौका कार्यरत आहेत. नियमभंग करणाऱ्या ट्रॉलर्सवर कारवाई केली जात आहे. १५ मिटर लांबीची हायस्पीड बोट या कामी कार्यरत आहे. मिनी पर्सिननेटव्दारे मच्छिमारी करताना ४६ बोटी आढळून आल्या त्यांची केरोसिन सब्सिडी रोखण्यात आली आहे. ५४ ट्रॉलर्स जे किनाऱ्यावर मच्छिमारी करीत होते त्यातील ३१ ट्रॉलर्स सिकेरीनजीक तर २३ ट्रॉलर्स काकराजवळ सापडले. १३ ट्रॉलर्स तर एक नॉटिकल मैलपेक्षा कमी अंतरात मासेमारी करीत होत्या. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीतील किनारी पोलिसांकडून प्राप्त अहवालानुसार २४६ बोटी विना ओळखपत्र मच्छिमारीसाठी समुद्रात गेल्या.

दुसरीकडे बुल ट्रॉलिंग व एलईडी दिवे वापरुन केल्या जाणाऱ्या मासेमारीवर बंदी घालण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. काही कडक निर्बंध घालण्यासाठी १९८0 च्या मरिन फिशिंग रेग्युलेशन कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याचे संकेतही मच्छिमारीमंत्री पालयेंकर यांनी दिले आहेत. एलईडी मच्छिमारी बंदीचा नियम सर्व राज्यांना लागू व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पत्र लिहिणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले आहे.

एलईडी वापरुन केल्या जाणाºया मासेमारीच्या प्रश्नावर मंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. खात्याचे सचिव गोविंद जयस्वाल तसेच भारत सरकारचे मच्छिमारी विकास आयुक्त पॉल पांडियान, सेंट्रल मरिन फिशरीज रीसर्च इन्स्टिटयुटचे के. मोहम्मद यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कृषीमंत्री विजय सरदेसाई हेही यावेळी उपस्थित होते.

गोवा, केरळ, कर्नाटक व महाराष्ट्राचे अधिकारी, मच्छिमार प्रतिनिधी हजर होते. १२ सागरी मैल अंतराच्या आतही आधुनिक तंत्रज्ञान वापरुन (बुल ट्रॉलिंग) मोठे मासे पकडून आणले जातात तसेच एलईडी दिव्यांचाही मासेमारीसाठी वापर केला जातो. गोव्याचेच नव्हेत तर केरळ, मंगळूरु तसेच शेजारी सिंधुदुर्ग रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात ट्रॉलर गोव्याच्या हद्दीत येऊ न बुल ट्रॉलिंग करतात, अशी तक्रार आहे.

उद्या केंद्रीय मंत्र्यांना भेटणारमंत्री पालयेंकर सध्या दिल्लीत असून उद्या गुरुवारी केंद्रीय कृषी तथा मच्छिमारी खात्याचे मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन गोव्यातील मासेमारीविषयक समस्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत. पावसाळ्यात मासेमारीबंदीचा काळ समान असावा तसेच बुल ट्रॉलिंग व एलईडी दिवे वापरुन केल्या जाणाऱ्या मासेमारीवर सर्वच राज्यांना बंदी लागू असावी, अशी मागणी पालयेंकर करणार आहेत.