शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
4
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
5
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
6
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
7
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
8
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
9
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
10
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
11
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
12
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
13
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
14
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
15
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
16
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
17
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
18
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
19
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
20
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:49 IST

एका पत्राद्वारे गंभीर सूचना केल्या असून, अपघातप्रवण रस्ते, अपुरी साइन व्यवस्था याकडे लक्ष वेधत तातडीने सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात वाढत चाललेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एका पत्राद्वारे गंभीर सूचना केल्या आहेत. या पत्रात गडकरी यांनी गोव्यातील अपघातप्रवण रस्ते, अवैज्ञानिक रस्ते रचना, आणि अपुरी साइन व्यवस्था याकडे लक्ष वेधत तातडीने सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

याबाबत, गडकरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग, पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते, अरुंद वळणे, अंधारे चौक आणि अपघातप्रवण पट्टयांवर योग्य दिशादर्शक फलक, वेगमर्यादा सूचक साइनबोर्ड, प्रकाशव्यवस्था तसेच रस्त्यांची सुरक्षित रचना तत्काळ सुधारण्याची आवश्यकता आहे.गडकरी यांनी रस्ते सुरक्षेसाठी वैज्ञानिक पद्धतीने ऑडिट करणे, ब्लॅक स्पॉट्स ओळखून त्वरित उपाययोजना राबवणे आणि केंद्र-राज्य समन्वयातून कामे गतीने पूर्ण करण्याचे सुचवले आहे. 

वाढता पर्यटन ताण, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि वेगमर्यादा उल्लंघन ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. सरत्या वर्षात, सन २०२५ मध्ये राज्यात रस्ते अपघातांमध्ये २६१ जणांचा मृत्यू झाला असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. मागील तीन वर्षाची अपघात विषयक नोंदी पाहता अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे, परंतु ते अजून कमी होणे गरजेचे आहे.

राज्यात २०२३ आणि २०२४ मध्ये अपघाती मृत्यूंचा आकडा जवळपास समान पातळीवर असताना, २०२५ मध्ये काही प्रमाणात घट दिसून येते. मात्र, तीन वर्षातील आकडेवारी पाहता गोव्यात गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातांमधील मृत्यूंची संख्या चिंताजनक असल्याचे स्पष्ट होते. वर्षभरात २६१ जणांचा बळी जाणे ही गंभीर बाब असून रस्ते सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, साइनज, रस्त्यांची रचना आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची नितांत गरज अधोरेखित होते.

अपघातांबाबत गांभीर्य कमी

वाहतूक विषयाचे अभ्यासक आणि गोवा रस्ता सुरक्षा मंचचे प्रमुख दिलीप नाईक यांनी रस्ता अपघातांवर गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२२ मध्ये एक व्यापक बैठक घेऊन रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी उत्सुकता दाखविली होती. त्यावेळी आम्ही रस्ते अपघात कमी करण्यासाठी इतर प्रगत देशात हाती घेतल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती देऊन तसा आरखडा बनविण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. मुख्यमंत्र्यांना ही सूचना पटलीही होती आणि अंमलबजावणीचा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु नंतर तीन वर्षात काहीच झाले नाही.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्राच्या सूचनांची दखल घेत अपघातप्रवण रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत. रस्ते सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Address rising road accidents in Goa: Gadkari urges CM action.

Web Summary : Nitin Gadkari alerted Goa CM to rising accidents, citing flawed roads and inadequate signage. He stressed audits, black spot fixes, and coordination. Tourism, drunk driving, speeding are key factors. Deaths are alarming, demanding strict enforcement and improved infrastructure.
टॅग्स :goaगोवाNational Highwayराष्ट्रीय महामार्गNitin Gadkariनितीन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरीPramod Sawantप्रमोद सावंतAccidentअपघात